Google AI Tech : गुगलची एआय टेक्नॉलॉजी चोरून चीनला विकत होता इंजिनिअर; अमेरिकेत झाली अटक

Ex-Google Employee arrested : अमेरिकेतील अटॉर्नी जनरल मॅरिक गारलँड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिनवेई हा इंजिनिअर चीनमधील दोन कंपन्यांना गुप्त माहिती पुरवत होता.
Google AI Tech
Google AI TecheSakal

Ex-Google Engineer arrested for stealing AI Technology : अमेरिकेत गुगलच्या एका माजी सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. गुगलची एआय टेक्नॉलॉजी चोरुन ती चीनला विकल्याचा आरोप या व्यक्तीवर लावण्यात आला आहे. लिनवेई डिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. चिनी नागरिक असलेल्या लिनवेईला बुधवारी कॅलिफोर्नियामधून अटक करण्यात आली.

अमेरिकेतील अटॉर्नी जनरल मॅरिक गारलँड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिनवेई हा इंजिनिअर चीनमधील दोन कंपन्यांना गुप्त माहिती पुरवत होता. ट्रेड सीक्रेट्स चोरी करण्याचे कित्येक आरोप या व्यक्तीवर लावण्यात आले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास लिनवेईला प्रत्येक आरोपासाठी 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

चोरी सहन करणार नाही

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बार असोसिएशन कॉन्फरन्समध्ये या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी एफबीआयचे डिरेक्टर देखील उपस्थित होते. अटॉर्नी जनरल म्हणाले की अमेरिकेतील जस्टिस डिपार्टमेंट हे एआय आणि इतर एडव्हान्स टेक्नॉलॉजीची चोरी सहन करणार नाही, ज्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल. अमेरिकेचं तंत्रज्ञान चुकीच्या हातांमध्ये जाणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले.

Google AI Tech
Google Issues Apology : ‘गुगल’ने मागितली भारताची माफी! ‘जेमिनी’च्या गोंधळासंदर्भात केंद्राच्या नाराजीनंतर उपरती

कसा चोरला डेटा

लिनवेईने 2019 साली गुगल जॉईन केलं होतं. त्याच्याकडे कंपनीच्या सुपरकम्प्युटिंग डेटा सेंटरची सर्व गोपनीय माहिती होती. ही माहिती तो आपल्या पर्सनल गुगल क्लाऊड अकाउंटमध्ये अपलोड करायचा. यामध्ये 100 पेक्षा अधिक महत्त्वाच्या फाईल्स होत्या. गुगलला रामराम ठोकल्यानंतर डिंग दोन चिनी कंपन्यांसोबत काम करत होता. यातील एका कंपनीचा तो चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर होता, तर दुसऱ्या स्टार्टअप कंपनीत तो सीईओ होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com