काम करता करता व्यायाम

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

ऑफिसचे काम प्रत्येकालाच इतके अधिक असते, की घरीसुद्धा लॅपटॉपसमोरच बसून राहावे लागते, अशीच स्थिती आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम आवश्‍यक असतो; मात्र, कामात व्यग्र असणाऱ्यांना वेळ कुठे असतो?

अमेरिकेतील डॉक्‍टरांनी नुकताच बसून काम करायची सवय बदलण्याचा सल्ला कर्मचाऱ्यांना दिला आहे. याचाच भाग म्हणून तिथे बरेच जण स्टॅंडिंग, बाईक डेस्क किंवा स्विस बॉल चेअर, टेबल-टेनिस मीटिंग टेबल असे पर्याय वापरत आहेत. लेखिका लारा केम्प यांनी कामाच्या डेस्कलाच थेट "ट्रेडमिल'मध्ये बदलले आहे.

या "ऑफिस फिटनेस डेस्क'मुळे काम करताना व्यायामही करता येतो! कामात व्यत्यय न येता तासाभरात दीडशे कॅलरी जळतात, असे लारा सांगतात. एकोणचाळीस वर्षांची लारा आई असून, ती घरूनच काम करते. जिमला जाण्यासाठी वेळ काढणे आणि घर सोडणे तिला शक्‍य होत नव्हते.

त्यामुळे तिने हा "ऑफिस फिटनेस डेस्क' घरी आणला. दिवसातील तीन तास, आठवड्यातील पाच दिवस उभे राहिल्याने साडेसातशेपेक्षा अधिक कॅलरी जळतात. हे दहा मॅरेथॉन पळण्यासारखे आहे. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर व कामावरदेखील होतो. यामुळे एकाग्रता वाढून काम दहा पटींनी अधिक चांगले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The exercise works