Facebook Followers : फक्त तुमचेच नाही, तर मार्क झुकरबर्गचेही फॉलोवर्स कमी झालेत; कशामुळे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook Followers
Facebook Followers : फक्त तुमचेच नाही, तर मार्क झुकरबर्गचेही फॉलोवर्स कमी झालेत; कशामुळे?

Facebook Followers : फक्त तुमचेच नाही, तर मार्क झुकरबर्गचेही फॉलोवर्स कमी झालेत; कशामुळे?

तुमच्या फेसबुक फॉलोवर्सची संख्या अचानक कमी झाली आहे का? किंवा आणखी कोणी तुमच्या जवळ अशी तक्रार केली का? नक्कीच केली असेल. फक्त तुमच्यात नाही तर फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गचे फॉलोवर्सही कमी झाले आहेत. तुमचे फॉलोवर्स कितीही असूदे, ते ९ हजारवरच येऊन थांबले आहेत. असं कशामुळे झालं?

हेही वाचा: Facebook च्या 10 लाख यूजर्सचा डेटा चोरीला; लगेच बदला तुमचा पासवर्ड

फक्त तुमचे किंवा तुमच्या संपर्कातल्या लोकांचेच नव्हे तर मार्क झुकरबर्गचे फॉलोवर्सही कमी झाले आहे. त्याचेही आता फक्त ९,९९३ फॉलोवर्स शिल्लक राहिले आहेत. फेसबुकच्या एका बगमुळे रातोरात ही संख्या घटली आहे. हजारो फॉलोवर्स कमी झाले आहेत. फेक फॉलोवर्स काढून टाकल्याने, तसंच फेक अकाऊंट्स डिलीट केल्याने हे झालं असावं, अशीही चर्चा आहे. पण मग असा प्रश्न उपस्थित होतो की, मार्क झुकरबर्गचे सगळेच फॉलोवर्स फेक होते का?

हेही वाचा: Facebook : 'ती' १६०० खाती फेसबूकने का हटवली ?

फक्त भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही याचा फटका बसला आहे. अमेरिकेतल्या काही मोठ्या माध्यम संस्थांचे फेसबुक फॉलोवर्स अचानक कमी झाले आहेत. न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, द हिल अशा अनेक माध्यमांचे फेसबुक फॉलोवर्स कमी झाले आहे. एप्रिल आणि जून २०२२ या काळात फेसबुकला १.४ बिलीयन बोट म्हणजेच खोट्या किंवा रोबोटच्या साहाय्याने चालवल्या जाणाऱ्या अकाऊंटवर शंका आली होती. त्यानंतर फेसबुकने गेल्या तीन महिन्यांत ही फेक अकाऊंट्स बंद केली.

आम्हाला शक्य तितकी सगळी फेक अकाऊंट्स काढायची आहेत. यातली अनेक अकाऊंट्स खोट्या प्रचारासाठी चालवली जात आहे आणि त्यांना आर्थिक प्रोत्साहनही देण्यात आलं आहे.