जगभरात Facebook, WhatsApp झाले Down

टीम ई-सकाळ
बुधवार, 3 जुलै 2019

WhatsApp चे व्हिडिओ आणि फोटो अपलोड होत नाहीत, अशाप्रकारचे ट्विट युजर्सकडून केले जात आहेत. तसेच Facebook आणि Instagram वापरण्यातही अडचणी येत असल्याचा तक्रारी केल्या आहेत. 

नवी दिल्ली : Facebook, Instagram आणि WhatsApp यांसारख्या सोशल मीडिया जगभरात डाऊन झाल्या आहेत. मागील काही मिनिटांपासून युजर्सना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे युजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

WhatsApp चे व्हिडिओ आणि फोटो अपलोड होत नाहीत, अशाप्रकारचे ट्विट युजर्सकडून केले जात आहेत. तसेच Facebook आणि Instagram वापरण्यातही अडचणी येत असल्याचा तक्रारी केल्या आहेत. 

दक्षिण अमेरिका, युरोप, जपानसारख्या देशांत Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडथळे येत आहेत. तर भारतातील काही शहरांत अशा प्रकारच्या समस्या येत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Instagram WhatsApp have been Down