Facebook Post: फेसबुकवर 'या' पोस्ट शेअर करत असाल तर थांबा, तुम्हाला होऊ शकते जेल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर आपण अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. पण एका चुकीच्या पोस्टमुळे तुम्हाला जेल होऊ शकते.
Facebook
FacebookSakal

Facebook Post Alert: आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाचा वापर देखील वाढला आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु, या प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आपण या प्लॅटफॉर्म्सवर अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. मात्र, एक चुकीची पोस्ट तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते. फेसबुक वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

भारतातील कायदे आहेत कठोर

सोशल मीडियावर नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. भारतात याबाबत कठोर कायदे आहे. देशात बोलण्याचे स्वतंत्र असले तरीही त्यावर काही मर्यादा देखील आहे. तसेच, तुमच्या पोस्टमुळे कोणत्याही धर्माच्या अथवा समुदायाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

भारतीय सूचना तंत्रज्ञान कायदा - २००० अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि आजीवन कारावास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे अकाउंट हॅक करणे, चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे, बनवणे अथवा एखाद्याला शेअर करणे, फ्री स्पीचचे उल्लंघन केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल.

Facebook
Smartphone Offers: ११ हजारात खरेदी करता येईल ३३ हजारांचा शानदार ५जी फोन, फीचर्स भन्नाट

सोशल मीडियावर पोस्ट करताना घ्या काळजी

सोशल मीडियावर पोस्ट करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या पोस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या, धर्माच्या अथवा समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच, शस्त्र आणि पोर्नोग्राफी काँटेंट देखील शेअर करू नये.

सोशल मीडियावर फॉरवर्डेड मेसेज शेअर करणे टाळावे. कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी त्याची पडताळणी करावी. सोबतच, देश-विरोधी, धर्म-विरोधी आणि हिंसेला प्रोत्साहन देणारा कॉन्टेंट शेअर करू नये. फेसबुक वापरताना केलेली एक चूक तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com