Call Forwarding Scam : डिलिव्हरी बॉयचा फोन अन् तुमचा नंबरच होतोय हॅक! काय आहे हा नवा स्कॅम? पाहा व्हिडिओ

Online Scam : यामुळे तुमच्या मोबाईल नंबरवर येणारे सर्व कॉल आणि एसएमएस हे हॅकर्सच्या नंबरवर जातात.
Call Forwarding Scam
Call Forwarding ScameSakal

तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याच वेगाने गुन्हेगार देखील गुन्ह्याच्या नवनवीन पद्धती शोधत आहेत. आजकाल आपण जवळपास सर्व व्यवहार आपल्या मोबाईलवरुन करत असल्यामुळे, कित्येक हॅकर्स आपला मोबाईल हॅक करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र सध्या एक नवीन प्रकारचा स्कॅम समोर आला आहे.

यामध्ये हॅकर्स तुमचा मोबाईल नव्हे, तर चक्क तुमचा मोबाईल नंबरच हॅक करत आहेत. यामुळे तुमच्या मोबाईल नंबरवर येणारे सर्व कॉल आणि एसएमएस हे हॅकर्सच्या नंबरवर जातात. यानंतर बँकेचे ओटीपी किंवा महत्त्वाचे कॉलदेखील तुम्हाला न मिळता थेट हॅकर्सना मिळतात. याबाबत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अ‍ॅस्ट्रो काऊन्सिल केके या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये एका तरुणीला अशाच एका हॅकरचा फोन आलेला दिसतो आहे. हा हॅकर एखाद्या ऑनलाईन शॉपिंग साईटमधून बोलत असल्याचं सांगतो, आणि डिलिव्हरी बॉय तुमचा पत्ता शोधत आहे असं या तरुणीला म्हणतो. तुमचं पार्सल हवं असेल तर डिलिव्हरी बॉयला कॉल करा असंही तो सांगतो.

Call Forwarding Scam
Power Bank Scam : 'हाय रिटर्न्स'चे आमिष दाखवून 150 कोटींची फसवणूक.. तुमच्याकडे तर नाहीत ना हे तीन अँड्रॉईड अ‍ॅप्स?

मात्र, इथेच एक गोम आहे. डिलिव्हरी बॉयचा नंबर डायल करण्यापूर्वी तुम्ही *401* हा कोड एंटर करा असं ही व्यक्ती तरुणीला सांगते. हा खरंतर कॉल फॉरवर्डिंग कोड असल्याचं या तरुणीने व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे. हा कोड एंटर करुन तुम्ही पुढे जो नंबर डायल कराल, त्या नंबरवर तुमचे फोन आणि एसएमएस फॉरवर्ड होतील, असं या तरुणीने सांगितलं आहे.

काय घ्यावी खबरदारी?

सर्वात आधी तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग कोडबद्दल माहिती हवी. तुमच्या मोबाईल नंबरवर ही सेवा सुरू करण्यासाठी *401* आणि पुढे मोबाईल नंबर डाएल करावा लागतो. जर तुम्हाला कोणी असं करण्यास सांगत असेल, तर सावध व्हा.

मोबाईल कंपन्या तुम्हाला कधीही स्वतःहून कॉल फॉरवर्डिंग सुरू करण्यास सांगत नाहीत. तसंच मोबाईल कंपन्यांचे कर्मचारी तुम्हाला पर्सनल नंबरवरुन फोन करत नाहीत. त्यामुळे असं होत असल्यास सावध व्हा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com