

Faridabad student death risks of gaming addiction
esakal
दिल्ली-एनसीआर भागात ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, फरिदाबाद येथील YMCA विद्यापीठात बी.एस्सी. तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी ऑनलाइन गेमिंगमध्ये पूर्णपणे गुंतला होता. गेम खेळताना त्याने आपली आयुष्यभराची बचत गमावली. या आर्थिक तोट्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. शेवटी त्याने घरातच स्वतःवर गोळी झाडली. कुटुंबीयांनी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले तेव्हा तो मृत्यू पावला होता.