फास्टफूडचा परिणाम व्यसनासारखाच..

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

चॉकलेट, पिझ्झा , फ्रेंच फ्राईज यांसारखे खूप प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ व्यसनासारखेच असतात, असा संशोधकांचा दावा आहे. एखाद्या ड्रगसारखाच परिणाम या अन्नपदार्थांमुळे होतो. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी कोणते पदार्थ व्यसन ठरू शकतात, या विषयावर संशोधन केले. अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त चवदार मानले जातात आणि त्याला अधिक पसंती दिली जाते. मात्र, काही विशिष्ट प्रकारच्या पदार्थांना व्यसनासारखा प्रतिसाद मिळतो का, हे माहिती नव्हते.

चॉकलेट, पिझ्झा , फ्रेंच फ्राईज यांसारखे खूप प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ व्यसनासारखेच असतात, असा संशोधकांचा दावा आहे. एखाद्या ड्रगसारखाच परिणाम या अन्नपदार्थांमुळे होतो. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी कोणते पदार्थ व्यसन ठरू शकतात, या विषयावर संशोधन केले. अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त चवदार मानले जातात आणि त्याला अधिक पसंती दिली जाते. मात्र, काही विशिष्ट प्रकारच्या पदार्थांना व्यसनासारखा प्रतिसाद मिळतो का, हे माहिती नव्हते. जास्त प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यास मेंदूमध्ये काही बदलसुद्धा घडून येऊ शकतात, असेही या संशोधकांनी म्हटले आहे.""व्यसनासारखा परिणाम दाखवणारे काही विशिष्ट अन्नपदार्थ आणि त्यांचे गुणधर्म ओळखण्यातील ही पहिली पायरी म्हणता येईल. लठ्ठपणावरील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी याची मदत होऊ शकते. खाण्याच्या सवयीचे व्यसनात रूपांतर करणारे हे पदार्थ ओळखता आल्यास त्याप्रमाणे खाद्यपदार्थांसाठीचे मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांसाठीचे धोरण ठरवण्यास मदत होईल,''असे मत मुख्य संशोधक इरिका शुल्ट यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fast food addiction same results ..