
FASTag Annual Pass in India
esakal
भारतात रोड ट्रिपची मजा आता आणखी परवडणारी झाली आहे..फास्टॅगच्या वार्षिक पासमुळे प्रवास करायला उत्साही असलेले पंकज सोनी यांनी २५ दिवसांत १३ राज्यांचा प्रवास करून एक नवा विक्रम रचला. विशेष म्हणजे त्यांनी फक्त ३००० रुपयांत हा प्रवास पूर्ण केला आणि हजारो रुपये वाचवले. ऑगस्ट २०२५ मध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्वातंत्र्यदिनानिमित्त हा फास्टॅग वार्षिक पास सुरू केला जो वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.