FIFA World Cup मध्ये Google चाही 'गोल', २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google

FIFA World Cup मध्ये Google चाही 'गोल', २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं...

FIFA World Cup 2022: शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या फीफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात करत विजेतेपदावर नाव कोरले आहे. मात्र, याचवेळी गुगलने देखील एकप्रकारे ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दीड तासाच्या सामन्यादरम्यान संपूर्ण जग फक्त FIFA World Cup 2022 सर्च करत होते. विशेष म्हणजे मागील २५ वर्षात एखादी गोष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्च करण्याची ही पहिलीच घटना आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक असलेल्या फुटबॉलचा विश्वविजेता होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. २०२२ च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. १९७८ आणि १९८६ नंतर अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. मात्र, अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सच्या एम्बापे यांच्यातील चुरस संपूर्ण जग श्वास रोखून पाहत होते.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

या सामन्यादरम्यान इंटरनेटवर केवळ FIFA World Cup या शब्दांचीच चर्चा होते. विशेष म्हणजे गुगलच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे काही घडले आहे. स्वतः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

हेही वाचा: Online Payment: UPI वरून चुकीच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले पैसे? रिफंडसाठी फॉलो करा ही प्रोसेस

सुंदर पिचाई ट्विट (Google CEO Sundar Pichai) करत म्हणाले की, '#FIFAWorldCup दरम्यान सामन्याबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आले. मागील २५ वर्षात सर्वाधिक ट्रॅफिक या शब्दांना आले आहे. जणू संपूर्ण जग या एकमेव गोष्टीबाबतच सर्च करत होते.'

दरम्यान, कतारमध्ये रंगलेल्या फीफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या एम्बापेला गोल्डन बूट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर लिओनेल मेस्सीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि मार्टिनेझला सर्वोत्तम गोलकिपर म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा: Smartphone Offer: १२०० रुपयात मिळतोय ६४MP कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन, ऑफर २१ डिसेंबरपर्यंतच; पाहा डिटेल्स