Instagram Safety : हॅकर्स अन् स्पॅमपासून सुरक्षित राहायचंय? इंस्टाग्रामवरच्या 'या' 5 सेटिंग्स लगेच सुरू करा
Instagram Safety Setting : इंस्टाग्रामवर लोकप्रियता मिळवण्यासाठी बऱ्याचजणांचे प्रोफाइल सार्वजनिक (Public) ठेवलेले असते. त्यामुळे तुमच्या पोस्ट्स, स्टोरीज, रील्स अधिक लोकांपर्यंत पोहोचतात आणि फॉलोअर्स वाढतात. पण या प्रसिद्धीबरोबरच काही धोकेही वाढतात जसे की स्पॅम, ट्रोलिंग, स्कॅम्स, बनावट खाते तयार होणे आणि हॅकिंगचा धोका.
अशा परिस्थितीत, इंस्टाग्रामने दिलेल्या काही सुरक्षा सेटिंग्स वापरून तुम्ही तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवू शकता तेही प्रोफाइल प्रायव्हेट न करता! आम्ही सांगितलेल्या पाच महत्त्वाच्या सेटिंग्स तुम्ही लगेच अॅक्टिव्हेट केल्या पाहिजेत
१. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अॅक्टिव्हेट करा
हे एक अतिरिक्त सुरक्षा कवच आहे. पासवर्ड टाकून लॉगिन केल्यावर इंस्टाग्राम तुमच्या फोनवर किंवा ऑथेंटिकेटर अॅपमध्ये एक कोड पाठवेल. तो कोड टाकल्याशिवाय लॉगिन होणार नाही. त्यामुळे तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित राहील.
कसं अॅक्टिव्हेट कराल?
Settings > Security > Two-Factor Authentication वर जा आणि दिलेल्या सूचना पूर्ण करा.
२. ‘Restrict’ फिचर वापरा
जर कोणी तुमच्या DM किंवा कमेंट्समधून त्रास देत असेल, पण तुम्हाला त्याला थेट ब्लॉक करायचं नसेल, तर ‘Restrict’ फिचर वापरू शकता.
या सेटिंगमुळे समोरच्याला त्याचं कम्युनिकेशन मर्यादित केलं गेलंय हे कळणारही नाही.
कसं अॅक्टिव्हेट कराल?
त्याच्या प्रोफाइलवर जा → थ्री डॉट टॅप करा → Restrict निवडा.
३. आक्षेपार्ह कमेंट्स फिल्टर करा
इंस्टाग्रामवर एआयच्या मदतीने किंवा स्वतः सेट केलेल्या कीवर्ड्सच्या आधारावर तुम्ही आपोआप आक्षेपार्ह कमेंट्स लपवू शकता.
हा फिचर अॅक्टिव्ह केला की अश्लील, अपमानास्पद, स्पॅम कमेंट्स तुमच्या पोस्टवर दिसणार नाहीत.
कसं अॅक्टिव्हेट कराल?
Settings > Privacy > Hidden Words
→ Hide Comments आणि Custom Word Filter ऑन करा.
४. कोण तुम्हाला टॅग किंवा मेंशन करू शकतं यावर नियंत्रण ठेवा
स्पॅम पोस्ट्समध्ये टॅग होणं किंवा अनोळखी लोकांनी स्टोरीत मेंशन करणं टाळण्यासाठी हे कंट्रोल उपयुक्त आहे.
कोणालाही टॅग किंवा मेंशन करण्याची परवानगी नाकारू शकता.
कसं अॅक्टिव्हेट कराल?
Settings > Privacy > Tags/Mentions
→ People You Follow किंवा No One पर्याय निवडा.
५. लॉगिन अॅलर्ट्स ऑन ठेवा
जर कोणीतरी तुमच्या अकाउंटमध्ये अज्ञात डिव्हाइसवरून लॉगिन करत असेल तर इंस्टाग्राम तुम्हाला अॅलर्ट देईल. त्यामुळे तुम्ही लगेच ते अॅक्शन घेऊ शकता.
कसं अॅक्टिव्हेट कराल?
Settings > Security > Login Activity
→ अनोळखी लॉगिन तपासा
→ Emails from Instagram मध्ये नोटिफिकेशन ऑन ठेवा.
हे पाच फिचर्स आजच अॅक्टिव्ह करा आणि तुमचं इंस्टाग्राम प्रोफाइल हॅकर्स, स्कॅमर्स आणि ट्रोल्सपासून सुरक्षित ठेवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.