esakal | फक्त 38 हजारांत घ्या Apple iPhone 12| flipcart sale
sakal

बोलून बातमी शोधा

आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळते आहे.

Flipkart : फक्त 38 हजारांत घ्या Apple iPhone 12

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आयफोन असावा असे अनेकांना वाटते. अनेकांना तो महाग असल्याने परवडत नाही. पण ज्यांना आयफोन घ्यायचाय त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. फ्लिपकार्टवर 3 ते 10 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या बीग बिलियन डेज सेलमध्ये  Apple iPhone 12 आणि  iPhone 12 मिनीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळणार आहे.

iPhone12 मिनी  

64 जीबी स्टोरेज असलेल्या iPhone12 मिनी मॉडेलची मूळ किंमत 59,900 रूपये आहे. हे मॉडेल सेलमध्ये 38,999 मध्ये मिळते आहे. तर,128 जीबी स्टोरेज असलेला फोनची मुळ किंमत 64,900 रूपये असून तो सेलमध्ये 43,999रूपयांना मिळत आहे. iPhone12 मिनीच्या ़टॉप मॉडेलमध्ये 256 जीबी स्टोरेजचा पर्यायही दिला आहे. यात काळा, निळा, हिरवा, पर्पल असे रंग असून सेलमध्ये तो 53,999 रूपयांना मिळतो आहे. या फोनची मूळ किंमत 74,900 रूपये आहे.

iPhone12

64 जीबी स्टोरेज असलेल्या iPhone 12 ची मूळ किंमत 65,900 रूपये आहे. तो सेलमध्ये 49,999 रूपयात मिळतो आहे. तर, 128 जीबी स्टोरेज असलेल्या iPhone 12 ची मूळ किंमत 70,900 रूपये असून सेलमध्ये तो 55,999 रूपयांना मिळतो आहे. तर  iPhone12च्या ़टॉप मॉडेलमध्ये 256 जीबी स्टोरेजचा पर्यायही दिला आहे. 80,900 रूपये मूळ किंमत असलेला हा फोन सेलमध्ये 66,999 रूपयांना मिळतो आहे.

आणखी ऑफर्स 

15,800 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली आहे. हा फोन आयसीआय कार्डमार्फत घ्यायचा असेल तर 10 टक्के डिस्काऊंट दिले आहे. नो कोस्ट ईएमआय पेमेंटचा पर्यायही ग्राहकांना देण्यात आला आहे.

loading image
go to top