
Motorola G96 5G Discounted to Rs 12000 in Flipkart Diwali Sale
esakal
Flipkart Diwali Sale Discount Offers : दिवाळीच्या उत्साहात फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मोटोरोला G96 5G स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत मिळत आहे. गेल्या जुलैमध्ये लॉन्च झालेला हा मिड बजेट स्मार्टफोन आता अवघ्या 12,000 रुपयांत घरी आणण्याची संधी आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणारा हा फोन पॉवरफूल 5500mAh बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेर्यासह येतो, ज्यामुळे तो तरुणाईसाठी आकर्षक पर्याय ठरतो.