
Flipkart Sale : रिपब्लिक डेच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने 2025 साठी आपला रिपब्लिक डे सेल जाहीर केला आहे. जानेवारी 14 पासून सुरू होणारा हा सेल ग्राहकांसाठी स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर मोठ्या सवलतींची पर्वणी घेऊन येणार आहे. फ्लिपकार्टचा हा पहिला मोठा विक्री कार्यक्रम असून, ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येत आहे.
फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलची सुरुवात 14 जानेवारीला होणार असून, 19 जानेवारीपर्यंत हा सेल चालेल. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना 13 जानेवारीपासूनच या सेलमध्ये खरेदीची संधी मिळणार आहे. प्लस सदस्यांसाठी तब्बल एक आठवडाभर सूट मिळणार आहे.
या सेलमध्ये स्मार्टफोनप्रेमींसाठी मोठ्या ऑफर्स आहेत. iPhone 16 आणि MacBook Air Mini M2 सारख्या प्रीमियम डिव्हाइसेसवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. तसेच, सॅमसंग गॅलेक्सी S23 आणि S24 5G सीरिजचे स्मार्टफोनही वाजवी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.
CMF Phone 1 (8GB रॅम आणि 128GB स्टोरेज) केवळ ₹14,000 मध्ये खरेदी करता येईल. या फोनची मूळ किंमत ₹16,999 होती.
MacBook M2 Air (16GB वेरिएंट) केवळ ₹75,000 मध्ये उपलब्ध असेल. सध्या त्याची किंमत ₹90,000 आहे.
Flipkartने या सेलसाठी आधीच विविध उत्पादनांच्या प्रमोशन्सची तयारी केली आहे. त्यामुळे खरेदी यादी तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर गॅझेट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळण्याची हमी आहे.
तुमचं बजेट आणि गरजांसाठी योग्य असलेल्या डील्ससाठी सेलच्या तारखांवर लक्ष ठेवा आणि तुमच्या खरेदीला आजच सुरुवात करा!