Flipkart Republic Day Sale 2026
Sakal
विज्ञान-तंत्र
Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी
Flipkart Republic Day 2026 : ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्टने प्रजासत्ताक दिन सेल 2026 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. हा सेल 17 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप आणि इतर उपकरणांवर बंपर सूट दिली जाणार आहे.
Flipkart Republic Day Sale 2026 Announced : जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स कंपनी Flipkart त्यांच्या पहिल्या मोठ्या सेलची, Flipkart Republic Day 2026 ची तारीख जाहीर केली आहे. कंपनीच्या टीझरनुसार, हा मेगा सेल 17 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. कंपनीने अद्याप हा सेल किती दिवसांसाठी असेल याबाबत माहिती दिलेली नाही. पण फ्लिपकार्टच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर प्रजासत्ताक दिनाच्या सेलसाठी एक समर्पित बॅनर देखील लाईव्ह करण्यात आला आहे. या सेलमध्ये केवळ मोबाईल फोनच नाही तर लॅपटॉप आणि इतर वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

