Smartphone Offer: अवघ्या 2 हजारात मिळतोय 108MP कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन, ऑफर एकदा पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Realme 9 Smartphone

Smartphone Offer: अवघ्या 2 हजारात मिळतोय 108MP कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन, ऑफर एकदा पाहाच

Offer On Realme 9 Smartphone: तुम्ही जर स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Realme 9 एक चांगला पर्याय आहे. १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट Flipkart वरून बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

बंपर डिस्काउंटनंतर Realme 9 स्मार्टफोन फक्त १,९९९ रुपयात तुमचा होईल. Realme 9 स्मार्टफोनवर मिळणाऱ्या या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Auto Expo 2023: MG ची शानदार इलेक्ट्रिक कार भारतात करणार एंट्री, सिंगल चार्जमध्ये पूर्ण शहर फिरता येईल

Realme 9 स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

Realme 9 स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत २०,९९९ रुपये आहे. परंतु, ३३ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर १२ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. परंतु, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा फोन फक्त १,९९९ रुपयात तुमचा होईल.

फोनवर इतर ऑफरचा देखील फायदा मिळेल. Paytm Wallet चा वापर करून खरेदी केल्यास १०० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तुम्ही फोनला दरमहिना २,३३४ रुपये देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनवर १ वर्षांची वॉरंटी देखील मिळते.

हेही वाचा: Recharge Plans: 5G डेटासाठी खर्च करावे लागणार फक्त 61 रुपये, 'या' कंपनीने लाँच केला स्वस्त प्लॅन

Realme 9 चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळतो. याशिवाय, फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

टॅग्स :mobilephoneflipkart