
फ्लिपकार्टवर 43 इंचाचे एलईडी स्मार्ट टीव्ही 12,500 रुपयांपेक्षा कमी दरात उपलब्ध आहेत.
शाओमी, टीसीएल, थॉमसन यांसारख्या ब्रँड्सवर 69% पर्यंत सवलत मिळते.
स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड, फायर, गुगल टीव्ही प्लॅटफॉर्मवर काम करतात.
ऑनलाइन खरेदीला जास्त पसंत करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर लवकरच सुरू होणाऱ्या बिग बिलियन डेज सेलपूर्वीच 43 इंचाच्या स्मार्ट एलईडी टीव्हींवर जबरदस्त सवलतींचा पाऊस पडला आहे. आता तुम्ही फक्त 12,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत फिलिप्स, टीसीएल, शाओमी, थॉमसन यासारख्या नामांकित ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता. तब्बल 69% पर्यंत सूट देणाऱ्या या ऑफर्समुळे ग्राहकांमध्ये उत्साह आला आहे.