
Flipkart SASA LELE Sale : ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी Flipkart आजपासून ग्राहकांसाठी एक खास मेगा सेल ‘SASA LELE’ सुरू करत आहे. ही विक्री केवळ एक नाही तर डबल ऑफर घेऊन येत असून, ग्राहकांना अर्ध्या किमतीत स्मार्टफोन, एसी, टीव्ही, लॅपटॉप, फ्रिज, फॅशन आणि गृहसजावटीच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. Flipkart Plus मेंबरसाठी हा सेल आजपासून (३ मे) उपलब्ध झाली असून इतर ग्राहकांसाठी ही सेल २ मे रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल.
या 'SASA LELE' सेलमध्ये Flipkart ग्राहकांना ५०% पर्यंत सूट, 2x ऑफर्स, 2x रिवॉर्ड्स आणि बाय वन गेट वन ५०% डिस्काउंट सारख्या आकर्षक ऑफर्स देत आहे. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. शिवाय, नो-कॉस्ट ईएमआय व एक्सचेंज ऑफर यांचा लाभही ग्राहक घेऊ शकतात.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर Flipkart SASA LELE सेलमध्ये Voltas, LG, Samsung, Blue Star, Daikin यांसारख्या नामांकित ब्रँडचे स्प्लिट आणि विंडो एसी ५०% पर्यंत सवलतीत विकले जात आहेत. यासोबतच एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय यामुळे ग्राहकांना खर्चाचा ताण जाणवणार नाही.
स्मार्ट टीव्ही किंवा नवीन फ्रिज खरेदी करायचा विचार करत असाल, तर हा सेल एक चांगला पर्याय आहे. Panasonic, Sony, LG आणि Samsung यांसारख्या ब्रँड्सचे टीव्ही आणि फ्रिज ग्राहकांना मोठ्या सूटमध्ये मिळत आहेत.
या सेलमध्ये DELL, HP, ASUS, Lenovo सारख्या नामांकित ब्रँड्सचे लॅपटॉप्स आणि Chromebook वर विशेष डील्स मिळत आहेत.
20,000 ते 30,000 किमतीच्या लॅपटॉपवर 4,750 पर्यंत सूट
40,000 ते 60,000 किमतीच्या लॅपटॉपवर 5,500 पर्यंत सूट
या विक्रीमध्ये केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरच नव्हे, तर कपडे, शूज, अॅक्सेसरीज आणि घर सजावटीच्या वस्तूंवरही मोठ्या प्रमाणात सवलती आहेत. बाय वन गेट वन, ५०% ऑफ ही ऑफरही अनेक फॅशन आयटम्सवर लागू आहे.
Flipkart चा हा SASA LELE सेल ३ मेपासून सुरु झाला असून मर्यादित कालावधीसाठीच आहे. त्यामुळे ग्राहकांनी यादी तयार करून शक्य तितक्या लवकर खरेदी करण्याचा सल्ला आम्ही देतोय. विशेषतः प्लस मेंबरसाठी काही खास डील्स केवळ आजच उपलब्ध असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.