शेवटची संधी! iPhone ते Google...ब्रँडेड स्मार्टफोन्सला सर्वात कमी किंमतीत खरेदीची संधी | Smartphone Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone

Smartphone Offer: शेवटची संधी! iPhone ते Google...ब्रँडेड स्मार्टफोन्सला सर्वात कमी किंमतीत खरेदीची संधी

Huge Discount On Bestseller Smartphones: ई-कॉमर्स साइट Flipkart वर Year End Sale सुरू आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सेलचा आज (३१ डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये Google Pixel 6a, iPhone, Nothing Phone 1 स्मार्टफोन्सला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. बेस्टसेलर स्मार्टफोन्सवर तुम्हाला बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.

स्मार्टफोन्सवर फ्लॅट डिस्काउंटसह बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये बँक ऑफ बडोदा आणि ICICI Bank च्या कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये मिळणाऱ्या या खास ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Upcoming Phone: Samsung करणार धमाका! आणणार ८ हजारांच्या बजेटमधील स्मार्टफोन; फीचर्स लीक

iPhone ते Pixel वर बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 13 वर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा चांगला पर्याय आहे. या फोनला तुम्ही ६१,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. फोनची मूळ किंमत ६९,९९० रुपये आहे. या किंमतीत तुम्ही १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला खरेदी करू शकता.

सेलमध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोनला देखील खूपच कमी किंमतीत खरेदी करता येईल. Samsung Galaxy S22+ 5G स्मार्टफोन ६९,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. बँक कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

गुगलचा Pixel 6a स्मार्टफोन देखील आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. या फोनची किंमत ४३,९९९ रुपये आहे. परंतु, ऑफरनंतर ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

५जी फोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

तुम्ही जर ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर POCO M4 Pro 5G स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनला फ्लिपकार्ट सेलमध्ये डिस्काउंटनंतर १२ हजार रुपयात खरेदी करता येईल. यामध्ये MediaTek Dimensity ८१० प्रोसेसर आणि ३३W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. याशिवाय, सेलमध्ये Realme, Vivo आणि Samsung चे फोन्स देखील स्वस्तात उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Recharge Plans: दररोज २.५ जीबी डेटासह येणारे सर्वात स्वस्त प्लॅन्स, डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन फ्री