प्रोग्रॅमेबल वायरलेस कंट्रोलर विकसित 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

स्मार्ट वॉचपासून ते ड्रोनपर्यंत सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचे आविष्कार पाहायला मिळतात. जर्मनीतील बर्लिनमधील "मायनॉरिटी रिपोर्ट' या साय-फाय कंपनीतील इंजिनिअर्स आणि कॉम्प्युटर संशोधकांनी "फ्लो' हा छोटा प्रोग्रॅमेबल वायरलेस कंट्रोलर विकसित केला आहे. सध्या माऊस वापरून जी कामे केली जातात ती सर्व कामे हा कंट्रोलर सहजपणे करू शकतो. 

विशेष म्हणजे माऊसपेक्षा हा अधिक संवेदनशील, लवचिक आणि सोईस्कर आहे. "फ्लो'च्या वर हवेत विशिष्ट पद्धतीने हात फिरवल्यास किंवा त्याला स्पर्श केल्यास आपल्याला डॉक्‍युमेंट एडिट करता येईल, चित्र काढता येईल किंवा ऍपदेखील वापरता येईल. तीसपेक्षा जास्त ऍप्लिकेशन्ससाठी आपण यात शॉर्टकट सेट करू शकतो.

मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी सध्या कंपनीच्यावतीने निधी गोळा करण्यात येत आहे. आपण रोज ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, म्युझिक, ब्राऊझिंग, प्रेझेंटेशन अशा कामांसाठी  कॉम्प्युटरचा कीबोर्ड, माऊस वापरतो; पण आपल्या हातांएवढी लवचिक आणि संवेदनक्षम काम त्यांच्याकडून होत नाही. यासाठी फ्लेक्‍झिबल, शॉर्टकट, परफेक्‍ट कंट्रोल देणाऱ्या एखाद्या उपकरणाची आवश्‍यकता होती. "फ्लो'च्या माध्यमातून आम्ही ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे,''असं निर्मात्यांनी सांगितलं. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flow programmable and wireless controller