फ्री कॉलिंग, २८ दिवसांसाठी 3GB डेटा; १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत सर्वकाही

Airtel, Jio आणि BSNL कडे अजूनही काही प्लॅन आहेत जे १ महिन्याच्या वैधतेसह पूर्ण फायदे देतात आणि त्यांची किंमत १०० रुपये आहे.
recharge plans
recharge plansgoogle

मुंबई : टेलिकॉम कंपन्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन ऑफर करत असतात. डेटासह मोफत कॉलिंगसह प्लॅनची ​​मागणी वेगाने वाढत आहे. प्रत्येकाला कमी किंमतीत अधिक फायदे असलेली योजना खरेदी करायची आहे. मात्र, आता स्वस्त योजनांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी झाली आहे.

recharge plans
BSNL वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी ! २९९ रुपयांत रोज 3GB हाय-स्पीड डेटा

Airtel, Jio आणि BSNL कडे अजूनही काही प्लॅन आहेत जे १ महिन्याच्या वैधतेसह पूर्ण फायदे देतात आणि त्यांची किंमत १०० रुपये आहे. तथापि, कंपन्या यापेक्षा कमी किंमतीत योजना देखील देतात. १०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीचा प्रीपेड प्लॅन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही येथे जाणून घेऊ शकता की या किंमतीत कोणती कंपनी अधिक फायदे देत आहे.

recharge plans
आता एकही पैसा खर्च न करता OTTवर पाहा बातम्या, क्रिकेट, चित्रपट

एअरटेल १०० रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेल आपल्या वापरकर्त्यांसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा ९९ रुपयांचा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते, ज्यामध्ये 200MP डेटा आणि ९९ रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे, ज्यामध्ये १ पैसे प्रति सेकंद शुल्क आकारले जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री एसएमएसचा लाभ मिळत नाही.

recharge plans
६ तासांची बॅटरी लाइफ, मजबूत ऑडिओ; बोटचे नवीन इअरबड्स लॉन्च, किंमत फक्त...

Jio चा १०० रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio त्याच्या प्रीपेड प्लॅन सूचीमध्ये १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन देखील ऑफर करते ज्याची किंमत ९१ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सना २८ दिवसांसाठी ३जीबी डेटा मिळतो. यामध्ये दररोज 100MB डेटा आणि 200MB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि ५० मोफत एसएमएस देखील उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व Jio अॅप्सचे विनामूल्य सदस्यत्वदेखील उपलब्ध आहे.

recharge plans
200MP कॅमेरा आणि android 13; जाणून घ्या सॅमसंगच्या नव्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

बीएसएनएलचा १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL १०० रुपयांपेक्षा कमीत ८७ रुपयांचा प्लॅन ऑफर करते. हा प्लॅन १४ दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये वापरकर्त्यांना दररोज 1GB डेटा दिला जातो. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये, वापरकर्त्यांना दररोज १०० विनामूल्य एसएमएस देखील मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com