Fridge Temperature in Winter : हिवाळ्यात किती ठेवावं फ्रीजचं तापमान? एक चूक पडू शकते महागात

Kitchen Tips : जेव्हा बाहेरच्या तापमानात बदल होतो, तेव्हा फ्रीजच्या आतील तापमानात बदल करणंही गरजेचं आहे. अन्यथा आतील वस्तू लवकर खराब होण्याची शक्यता असते.
Fridge Temperature in Winter
Fridge Temperature in WintereSakal
Updated on

Correct Temperature for fridge in winter : आजकाल किचनमध्ये फ्रीज असणं ही चैनेची नाही, तर गरजेची गोष्ट झाली आहे. त्यामुळे घरा-घरांमध्ये फ्रीज दिसून येतो. मात्र, या फ्रीजचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत अत्यंत कमी लोकांना माहिती असते. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये फ्रीजचं तापमान बदलणं गरजेचं असतं. (Refrigerator tips)

रेफ्रिजिरेटर, म्हणजेच फ्रीज हा आतील वस्तू फ्रेश ठेवण्यासाठी एक ठराविक तापमान कायम ठेवतो. मात्र, जेव्हा बाहेरच्या तापमानात बदल होतो, तेव्हा फ्रीजच्या आतील तापमानात बदल करणंही गरजेचं आहे. अन्यथा आतील वस्तू लवकर खराब होण्याची शक्यता असते. सोबतच, चुकीच्या तापमानावर फ्रीज वापरल्यास अधिक वीज बिल येण्याची शक्यताही तज्ज्ञ व्यक्त करतात. (Kitchen Tips)

फ्रीजचं तापमान (Fridge Temperature) बदलण्यासाठी दरवाजा उघडल्यानंतर समोरच एक डायल दिलेलं असतं. याठिकाणीच डीफ्रॉस्ट करण्याचं बटणही दिलेलं असतं. कित्येक नव्या फ्रीजमध्ये याठिकाणी समर, विंटर अशा ऋतूंमध्ये फ्रीजचं तापमान किती ठेवावं यासाठी मार्किंग दिलेलं असतं. मात्र, तुमच्या फ्रीजमध्ये याबाबत काही सूचना दिलेली नसेल, तर तुम्हाला स्वतःच ठराविक तापमान सेट करावं लागेल. (Fridge Temperature according to weather)

Fridge Temperature in Winter
Fridge Tips : भिंतीपासून किती दूर असावा फ्रीज? लाखो लोक करतात 'ही' मोठी चूक; तुम्ही नका करू

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यामध्ये फ्रीजचं तापमान 1.7 डिग्री सेल्सिअस ते 3.3 डिग्री सेल्सिअस एवढं ठेवावं. तसंच फ्रीजरचं टेप्मरेचर हे मायनसमध्ये न ठेवता 0 डिग्री सेल्सिअस ठेवावं. यामुळे फ्रीजचं पॉवर कंझम्प्शन कमी होतं, आणि त्यामुळे वीजबिल देखील कमी येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com