फर्निचर करणार गॅजेट चार्जिंग

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप अशी जीवनावश्‍यक गॅजेट चार्ज करण्यासाठीची विविध उपकरणे बाजारात येत आहेत."आयकिया'या स्वीडिश कंपनीने गॅजेट चार्ज करणारे फर्निचर विकसित केले आहे. त्यांनी क्‍यूआय वायरलेस टेक्‍नॉलॉजी वापरून गॅजेट चार्ज करणारे डेस्क, टेबल व दिवे बनवले आहेत. चार्ज करण्यासाठी गॅजेट फक्त या फर्निचरवर किंवा त्याच्या जवळ ठेवावे लागेल. याद्वारे आपण घरात किंवा कार्यालयामध्ये वायरींच्या पसाऱ्याशिवाय एकावेळी अनेक प्रकारची गॅजेट चार्ज करू शकता. कंपनीचे बिझनेस एरिया मॅनेजर जेनेट स्केल्मोस म्हणाले,""लोकांना घरात अनेक केबलचा वापर आवडत नाही.

स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप अशी जीवनावश्‍यक गॅजेट चार्ज करण्यासाठीची विविध उपकरणे बाजारात येत आहेत."आयकिया'या स्वीडिश कंपनीने गॅजेट चार्ज करणारे फर्निचर विकसित केले आहे. त्यांनी क्‍यूआय वायरलेस टेक्‍नॉलॉजी वापरून गॅजेट चार्ज करणारे डेस्क, टेबल व दिवे बनवले आहेत. चार्ज करण्यासाठी गॅजेट फक्त या फर्निचरवर किंवा त्याच्या जवळ ठेवावे लागेल. याद्वारे आपण घरात किंवा कार्यालयामध्ये वायरींच्या पसाऱ्याशिवाय एकावेळी अनेक प्रकारची गॅजेट चार्ज करू शकता. कंपनीचे बिझनेस एरिया मॅनेजर जेनेट स्केल्मोस म्हणाले,""लोकांना घरात अनेक केबलचा वापर आवडत नाही. बॅटरी उतरणे आणि चार्जर सापडत नाही यांसारख्या प्रसंगांनाही त्यांना तोंड द्यावे लागते. या फर्निचरमुळे त्यांची या त्रासातून सुटका होईल आणि घरातील आयुष्य आणखी आरामदायी होईल. युरोप आणि उत्तर अमेरिकेत हे फर्निचर लवकरच उपलब्ध होईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Furniture will gadget charging