बॅग फुलविणारे स्मार्ट ऍप

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. घरामध्ये बाग फुलवायची आहे, मात्र तिची नेमकी काळजी कशी घ्यावी हे माहीत नसणाऱ्यांसाठी एक×ऍप विकसित करण्यात आले आहे."रचिओ इरो'नावाचे हे ऍप तुम्हाला घरच्या घरी बाग कशी फुलवावी, ऋतुनुसार झाडांना, आजूबाजूच्या हिरवळीला कधी, किती प्रमाणात पाणी घालावे याची माहिती देते. टाकाऊ पदार्थ आणि पाण्याचा पुनर्वापर कसा करावा, हेदेखील ऍपद्वारे समजते. तुमच्या स्मार्ट फोनला वाय फाय नेटवर्क जोडून बागेला ठराविक वेळेला पाणीपुरवठा करता येतो. यासाठी पंधरा हजार रुपये खर्च येतो. या ऍपमुळे तुम्हाला रोजच्या तापमानाची, पावसाची माहितीही मिळेल.

बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. घरामध्ये बाग फुलवायची आहे, मात्र तिची नेमकी काळजी कशी घ्यावी हे माहीत नसणाऱ्यांसाठी एक×ऍप विकसित करण्यात आले आहे."रचिओ इरो'नावाचे हे ऍप तुम्हाला घरच्या घरी बाग कशी फुलवावी, ऋतुनुसार झाडांना, आजूबाजूच्या हिरवळीला कधी, किती प्रमाणात पाणी घालावे याची माहिती देते. टाकाऊ पदार्थ आणि पाण्याचा पुनर्वापर कसा करावा, हेदेखील ऍपद्वारे समजते. तुमच्या स्मार्ट फोनला वाय फाय नेटवर्क जोडून बागेला ठराविक वेळेला पाणीपुरवठा करता येतो. यासाठी पंधरा हजार रुपये खर्च येतो. या ऍपमुळे तुम्हाला रोजच्या तापमानाची, पावसाची माहितीही मिळेल. हवामानानुसार बागेला पाणी देण्याची वेळही आपोआप पुढे ढकलली जाते. या ऍपमध्ये आपल्या आजूबाजूच्या रचिओ युजर्सचे रिपोर्टही शेअर केले जातात. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदाही आपली बाग फुलविण्यासाठी करता येतो. हे ऍप आयफोन आणि अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्ट फोनसाठी विकसित करण्यात आले आहे.

 

Web Title: Garden Devloping Smart App