आठवड्यात तिसरा मोठा झटका! मायक्रोसॉफ्ट आणि विमानसेवेनंतर आता अमेरिकेतील बँका ठप्प; नेमके काय घडले?

Global Tech and Banking Disruptions: ऑनलाइन ट्रान्झॅक्शन विस्कळीत! बँक ऑफ अमेरिका, चेजसह अनेक मोठे बँकिंग सर्व्हर डाऊन...
Global Tech & Banking Outages Analysis of Recent System Failures

Global Tech & Banking Outages: Analysis of Recent System Failures

esakal 

Updated on: 

Global Tech & Banking Outages: जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेत तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच असून, एकापाठोपाठ एक यंत्रणा कोलमडल्याच्या घटना समोर येत आहेत. अवघ्या एका आठवड्याच्या आत अमेरिकेत घडलेली ही तिसरी मोठी तांत्रिक दुर्घटना आहे. याआधी मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन होणे आणि त्यानंतर विमानसेवेचा खोळंबा झाल्यानंतर, आता अमेरिकेतील अनेक नामवंत बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे.

बँक ऑफ अमेरिका, चेज (Chase), जेपी मॉर्गन (JPMorgan), यूएस बँक, वेल्स फार्गो (Wells Fargo) आणि झेला (Zelle) यांसारख्या प्रमुख बँकांच्या ग्राहकांना आपल्या ऑनलाइन बँकिंग खात्यांमध्ये प्रवेश (Access) करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...