Email Delete Feature : गुड न्यूज! Gmail मध्ये आलं भन्नाट फीचर, एका क्लिकमध्ये डिलीट होणार हजारो ईमेल

Gmail Emails Delete manage subscriptions feature : गुगलने जीमेलसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही अनावश्यक ईमेल एका क्लिकमध्ये हटवू शकता.
Gmail Delete manage subscriptions feature
Gmail Delete manage subscriptions featureesakal
Updated on

Email Delete Feature : स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. गुगलने आपल्या जीमेल वापरकर्त्यांसाठी एक नवे आणि अत्यंत उपयुक्त फीचर सादर केले आहे. ‘मॅनेज सबस्क्रिप्शन’ नावाचं हे फीचर वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्समधील अनावश्यक, प्रमोशनल आणि सबस्क्रिप्शन ईमेल्स एका क्लिकमध्ये हटवण्याची मुभा देतंय. लाखो यूजर्सना त्रास देणाऱ्या ईमेल्सच्या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी हे फीचर अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जीमेल अकाउंट असणं अनिवार्य झालं आहे. शाळा, कॉलेज, बँकिंग, ऑनलाइन खरेदी, सोशल मिडिया सगळ्याच गोष्टींसाठी जीमेल वापरणं अपरिहार्य आहे. मात्र, याच जीमेल इनबॉक्समध्ये दररोज येणाऱ्या जाहिरातबाजीच्या मेल्समुळे महत्त्वाची माहिती शोधणं कठीण होतं. आणि अनेकदा चुकून एखादा महत्त्वाचा मेल दुर्लक्षित होतो.

हीच अडचण लक्षात घेऊन गुगलने ‘मॅनेज सबस्क्रिप्शन’ हे नावीन्यपूर्ण फीचर तयार केलं आहे. या फीचरच्या साहाय्याने तुम्ही पूर्वी ज्या वेबसाईट्सवर सबस्क्राइब केलंय, ते सर्व मेल्स एका यादीत पाहू शकता. यादी पाहून तुमच्यासाठी उपयुक्त वाटणाऱ्या मेल्स ठेवू शकता आणि बाकीचे एका क्लिकमध्ये हटवू शकता.

Gmail Delete manage subscriptions feature
Telegram Video Call : टेलिग्रामचं नवीन फीचर अन् गुगल, मायक्रोसॉफ्टला टेन्शन; व्हिडिओ कॉलसाठी एकदम बेस्ट, अपडेट बघा एका क्लिकवर

हे फीचर वापरचे कसे?

  1. तुमच्या जीमेल अ‍ॅप किंवा वेब व्हर्जनमध्ये लॉग इन करा.

  2. डाव्या बाजूला असलेल्या तीन ओळींवर (Menu) क्लिक करा.

  3. 'Promotions', 'Social', 'Spam' यासारख्या फोल्डर्ससोबतच आता ‘Manage Subscriptions’ हा नवीन पर्याय दिसेल.

  4. यावर क्लिक करताच, तुमचं संपूर्ण सबस्क्रिप्शन लिस्ट ओपन होईल.

  5. इथे तुम्ही सहजतेने नको असलेले ईमेल्स अनसबस्क्राइब करू शकता आणि फालतू मेल्स हटवू शकता.

Gmail Delete manage subscriptions feature
Whatsapp Web New Feature : व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये झाली जबरदस्त फीचरची एंट्री; अ‍ॅप डाऊनलोडची गरजच नाही, हे फीचर वापरा एका क्लिकवर

हे फीचर केवळ वेळ वाचवणारं नाही, तर तुमचा इनबॉक्स अधिक स्वच्छ, व्यवस्थित आणि कार्यक्षम ठेवण्यास मदत करणारं आहे. वापरकर्त्यांना वारंवार ईमेल उघडून ‘Unsubscribe’ बटण शोधण्याचा त्रास होणार नाही.

गुगलच्या या नव्या उपक्रमामुळे जीमेल वापराचा अनुभव अधिक चांगला आणि समाधानकारक होणार आहे. सततच्या ईमेलच्या गर्दीतून त्रासलेल्या युजर्ससाठी हे एक प्रकारचं ‘डिजिटल सूट सफाई’ मिशन ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com