व्हॉट्सॲप लोगो Golden करायचा? सोप्या पद्धतीने आयकॉन बदला

फेसबुकच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप सतत नवनवीन फीचर्स आणतो
Change the WhatsApp Logo to Golden Color
Change the WhatsApp Logo to Golden Colorgolden whatsapp logo

व्हॉट्सॲपचा (WhatsApp) लोगो हा सहसा हिरव्या रंगाचा असतो. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुम्हाला याच रंगाचा लोगो पाहायला मिळतो. मात्र, तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपचा लोगो सोनेरी रंगाचा करू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल कराव लागेल. हे काम तुम्ही सोप्या युक्तीने करू शकता. ते कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत. (Change the WhatsApp Logo to Golden Color)

फेसबुकच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (WhatsApp) सतत नवनवीन फीचर्स (New features) आणतो. या वर्षाच्या फीचरमधील पहिले वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या फोनच्या एक्सेलशिवाय डेस्कटॉप ॲपद्वारे कॉलिंग करणे. यासह पैसे पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सॲप पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.

Change the WhatsApp Logo to Golden Color
हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? जाणून घ्या कारण आणि उपाय

सोबतच ऑडिओ एडिट फीचर जे वापरकर्त्यांना पाठवण्यापूर्वी व्हॉइस नोट्स ऐकू देते. मीडिया फाईल्स अदृश्य करण्यासाठी व्यू-वन्स फीचरही आहे. मल्टी डिव्हाइस वैशिष्ट्यांद्वारे वापरकर्ते एकाच वेळी एकाधिक डिव्हाइसेस, फोन, लॅपटॉप किंवा टॅब्लेटवर व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरू शकतात.

असा करा बदल (Change the WhatsApp Logo to Golden Color)

  • व्हॉट्सॲपला सोनेरी रंगाचा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनवर नोव्हा लाँचर (Nova Launcher) डाउनलोड कराव लागेल.

  • नोव्हा लॉँचर (Nova Launcher) डाउनलोड झाल्यावर ॲप उघडावे लागेल

  • नंतर फोनवर तुमच्या आवडीची शैली (स्टाइल) निवडावी लागेल.

  • शैली निवडल्यानंतर सोनेरी व्हॉट्सॲप चिन्ह शोधाव लागेल.

  • आता तुम्हाला सर्वांत जास्त आवडेल ते चिन्ह डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल

  • आता दोन सेकंदांसाठी व्हॉट्सॲप आयकॉनवर टॅप कराव लागेल.

  • आता तुम्हाला स्क्रीन विंडोवर एडिटिंग पेन्सिल दिसेल. त्यावर टॅप करा आणि डाउनलोड केलेला सोनेरी व्हॉट्सॲप लोगो इमेज निवडण्यासाठी फोटो गॅलरीमध्ये जा आणि Done वर क्लिक करा.

  • नवीन वर्ष २०२२ चे स्वागत करण्यासाठी तुमचा व्हॉट्सॲप लोगो सोनेरी झालेला असेल.

  • तुम्ही डाउनलोड केलेला व्हॉट्सॲप लोगो हा पारदर्शक पीएनजी फॉरमॅटमध्ये असावा.

  • असे न झाल्यास तो सेट करता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com