Google Alert : गूगलवर सर्च करताय 'या' गोष्टी? महागात पडेल; तुरूंगात जावे लागू शकते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Alert: Dont Search these things on google

Google Alert : गूगलवर सर्च करताय 'या' गोष्टी? महागात पडेल; तुरूंगात जावे लागू शकते

गुगल सर्चचा वापर करून अनेक गोष्टी सहज सर्च करता येतात. खरं तर गूगलच्या मदतीने आज कशाचीही माहिती सेकंदात माहिती करून घेता येते. मात्र काही गोष्टी गूगलवर सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकतं. तुम्हाला माहिती आहे काय काही गोष्टी गूगल वर सर्च केल्याने तुम्हाला तु़रूंगातही जावं लागू शकतं. त्यामुळे चुकूनही गुगलवर खालील चार गोष्टी सर्च करू नका. (Google Alert: Dont Search these things on google)

महत्वाची बाब

गूगलचा वापर करताना बाँब कसा बनवतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात. जर तुम्हीही असा प्रयत्न करत असाल तर तुम्हीही सुरक्षा एजंन्सीच्या निशाण्यावर येऊ शकता.

चाईल्ड पॉर्न

गूगलवर अश्लील फोटो किंवा व्हिडिओज सर्च करू नये. असे केल्यास तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते. कदाचित अनेकांना माहिती नाही पण यावर भारतात विशेष कायदा आहे. त्याअंतर्गत तुमच्यावर अॅक्शन घेण्यात येऊ शकते. भारतात पोक्सो अॅक्ट अंकर्गत २०१२ पासून कलम १४ अंतर्गत चाइल्ड पॉर्न बघणे, त्यासंबंधित व्हिडिओ बनवणे किंवा स्वत:जवळ ठेवणे हा गुन्हा आहे. असे करताना तुम्ही पकडले गेल्यास तुम्हाला ५- ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

नक्षलवादी संघटनांबाबत सर्च

गूगलवर तुम्ही नक्षलवादी संघटनांशी कसे जुळायचे याबाबत कधी सर्च करू नका. असे केल्यास तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते.

गर्भपात करण्याचे उपाय

तरूण पिढीत लैंगिक संबंधातून अविवाहित मुली गरोदर झाल्या की मग भितीपोटी गूगलवर गर्भपाताचे उपाय सर्च करू लागतात. मात्र हे चुकीचे असून असे केल्यास तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. भारतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करणे कायद्याविरूद्ध आहे.