Google ची कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी; तुम्हाला अडचण येईल? जाणून घ्या

google launches secret ios app to help apple users switch to android
google launches secret ios app to help apple users switch to android

एखाद्याशी बोलत असताना कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही थर्ड-पार्टी ॲप्सची मदत घेत असाल तर तुम्ही यापुढे ते करू शकणार नाहीत. Play Store वरून थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्स ब्लॉक करण्यासाठी Google त्याचे Play Store धोरण अपडेट करत आहे. या बदलामुळे, Truecaller ने देखील सांगितले आहे की, Truecaller वापरून देखील कॉल रेकॉर्डिंग करता येणार नाहीये.

नवीन धोरणानुसार, ॲप्सना यापुढे Play Store वर कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी नसणार आहेत. मात्र, नवीन धोरणातील बदल, Reddit वापरकर्त्यांनी NLL ॲप्सद्वारे पाहिले होते,या धोरणअंतर्गत फक्त थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर परिणाम होणार आहे. कंपनीने अलीकडील डेव्हलपर वेबिनारमध्ये हे धोरण देखील स्पष्ट केले.

हे फोन वापरता येतील..

Google चे धोरण बदल केवळ Play Store वरील थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सपुरते मर्यादित आहे. Samsung, Redmi, Xiaomi, Vivo, Oppo, Poco, Realme, OnePlus आणि Tecno सारख्या ब्रँडचे अनेक स्मार्टफोन निर्मात्यांनी इनबिल्ट कॉल रेकॉर्डर फीचर दिले आहे जी 11 मे नंतर देखील काम करत राहील.

जे वापरकर्ते या ब्रँडचे फोन वापरतात त्यांच्यावर Google च्या नवीन Play Store धोरणाचा परिणाम होणार नाही. मात्र, या व्यतिरिक्त इतर ब्रँडचे फोन असलेल्या वापरकर्त्यांसाठी, नवीन धोरण महत्त्वपूर्ण आहे, विशेषत: जर त्यांनी त्यांचे इनकमिंग/आउटगोइंग कॉल वारंवार रेकॉर्ड करावे लागत असतील तर त्यांना अ़डचण येऊ शकते.

google launches secret ios app to help apple users switch to android
Marital Rape : दिल्ली हायकोर्टाचा विभाजीत निकाल, SC त जाण्याचा सल्ला

लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडचे बहुतेक फोन बेसीक कॉल रेकॉर्डिंग फीचर्ससह येत असल्याने, Play Store धोरणातील बदलांचा बहुतेक वापरकर्त्यांसाठी फारसा फरक करणार नाही.

Google हळूहळू अनेक Android व्हर्जनवर कॉल रेकॉर्डिंग सक्षम करणारे API काढून टाकत आहे. कंपनीने गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेचे कारण देत हा निर्णय़ घेतला आहे, या व्यतिरिक्त कॉल रेकॉर्डिंग कायदे देशानुसार भिन्न आहेत.

google launches secret ios app to help apple users switch to android
Sedition Law : 'नेहरूंनी केलं नाही ते मोदी सरकार करतंय', केंद्राचं SC त वक्तव्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com