गुगलने आणखी 34 धोकादायक Apps हटवली; तुम्ही तर वापरत नाही ना?

google banned 34 apps
google banned 34 apps

नवी दिल्ली: जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्याच्या काळात गुगलने प्ले स्टोअरवरून 34 ऍप्स काढून टाकली आहेत. कारण देताना गुगलने सांगितले आहे की, काढून टाकलल्या सर्व ऍप्स हे जोकर मालवेअरने बाधित झालेले आहेत, त्यामुळे स्मार्टफोन युजर्ससमोरील अडचणी वाढल्या आहेत. या मालवेअरद्वारे युजर्सचा डेटा चोरला जात आहे. 

तसं जोकर मालवेअर हे जुनंच मालवेअर आहे. पण आता या मालवेअरने ऍंड्रॉईड ऍप डेव्हलपर्ससमोरील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. म्हणून ज्या-ज्या  ऍप्समध्ये अशाप्रकारचे मालवेअर दिसून आले ते सर्व  ऍप्स गुगलने बॅन केले आहेत. विषेश म्हणजे या जोकर मालवेअर ऍप्समध्ये खूप क्लिष्ट कोडींग असल्याने ते ओळखण्यास तज्ज्ञांना अवघड जात आहे. 

जोकर मालवेअर (Joker malware) हे 'ड्रॉपर' या दुसऱ्या प्रकारे स्मार्टफोनमध्ये प्रवेश करुन हे मालवेअर युजर्सची सगळी माहिती घेते. कॅलिफोर्नियामधील जोकर मालवेअरने बाधित केलेल्या ऍप्सची यादी कॅलिफोर्नियास्थित झास्केलर (Zscaler) या सायबर सिक्युरिटी फर्मने उघड केली. मालवेअरद्वारे बाधित झालेल्या 34 ऍप्स कोणती आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया. ही ऍप्स तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून लवकरात लवकर काढून टाकली पाहिजेत.

1. All Good PDF Scanner
2. Mint Leaf Message-Your Private Message
3. Unique Keyboard - Fancy Fonts & Free Emoticons
4. Tangram App Lock
5. Direct Messenger
6. Private SMS
7. One Sentence Translator - Multifunctional Translator
8. Style Photo Collage
9. Meticulous Scanner
10. Desire Translate
11. Talent Photo Editor - Blur focus
12. Care Message
13. Part Message
14. Paper Doc Scanner
15. Blue Scanner
16. Hummingbird PDF Converter - Photo to PDF
17. All Good PDF Scanner
18. com.imagecompress.android
19. com.relax.relaxation.androidsms
20. com.file.recovefiles
21. com.training.memorygame
22. Push Message- Texting & SMS
23. Fingertip GameBox
24. com.contact.withme.texts
25. com.cheery.message.sendsms (two different instances)
26. com.LPlocker.lockapps
27. Safety AppLock
28. Emoji Wallpaper
29. com.hmvoice.friendsms
30. com.peason.lovinglovemessage
31. com.remindme.alram
32. Convenient Scanner 2
33. Separate Doc Scanner

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com