esakal | Chrome Browser मधील 'हे' भन्नाट फिचर देईल व्हायरसपासून अधिक सुरक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

google chrome

Chrome Browser मधील 'हे' भन्नाट फिचर देईल व्हायरसपासून अधिक सुरक्षा

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: Chrome Browser चे भारतासोबत जगभरात मोठे युजर्स आहेत. यासाठी आम्ही आज तु्म्हाला क्रोम ब्राउजरच्या काही खास फिचरबद्दल माहिती सांगणार आहोत. यासाठी तु्म्हाला कोणते ऍप डाउनलोड करण्याची गरज नाहीये. फक्त सेटिंग्समध्ये काही बदल करायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया क्रोम ब्राउजरच्या शेफ्टी शिल्डबद्दल अधिक...

क्रोम ब्राउजरचा उपयोग कंप्यूटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोनमध्ये अधिक केला जातो. इंटरनेट सर्चिंग दरम्यान अनेक युजर्स डिव्हायसमध्ये व्हायरस येतो. तसेच त्यामुळे अनेक ऍप हॅक होण्याची शक्यताही बळावते. यासाठी ब्राउजरच्या सेटिंग्जमध्ये एक फिचर दिलेले आहे जे ब्राउजरच्या सुरक्षेत वाढ करते.

हेही वाचा: IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट

यासाठी पहिल्यांदा कंप्यूटर किंवा लॅपटॉपचे क्रोम ब्राउजर उघडा. त्यानंतर सेटिंग्ज या विकल्पावर क्लिक करा. तिथं डाव्या बाजूला Privacy and Security हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रिनच्या मध्ये, सेफ ब्राउजिंगमध्ये स्टॅंडर्ड प्रोटेक्शनवर क्लिक केले असेल, तिथं जाऊन Enhanced protection हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

हेही वाचा: Rolex Rings IPO: उद्या होणार रोलेक्स रिंग्जचा आयपीओ लाँच

गुगल क्रोमच्या सेटिंग्सच्या आत जाऊन तुम्ही Site Settings या ऑप्शनवर जावा. तिथं तुम्हाला लोकेशन हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही कोणते- कोणते ऍप तुमचे लोकेशल ट्रॅक करत आहेत ते समजेल. जर गरजेचे नसेलेल ऍप लोकेशन ट्रॅक करत असतील तर ते तुम्ही बंद करू शकता.

loading image
go to top