Google Chrome: गुगल क्रोम होणार बंद! लॅपटॉप वापरत असाल तर त्वरित करा 'हे' काम

मायक्रोसॉफ्ट जुने व्हर्जन असलेल्या विंडोज लॅपटॉप आणि डेस्कटॉपसाठी गुगल क्रोमला सपोर्ट देणे बंद करणार आहे. यामुळे सिक्योरिटी फीचर्सचा फायदा मिळणार नाही.
Google Chrome
Google ChromeSakal

Google Chrome Update: अनेकजण लॅपटॉप अथवा डेस्कटॉपवर वेब ब्राउजर गुगल क्रोमचा वापर करतात. मात्र, लवकरच अनेकांना गुगल क्रोम वापरता येणार नाहीये. मायक्रोसॉफ्ट जुने व्हर्जन असलेल्या विंडोज लॅपटॉप आणि डेस्कटॉपसाठी गुगल क्रोमला सपोर्ट देणे बंद करणार आहे.

विंडोज सर्व्हर २०१२ च्या सर्व व्हर्जनसाठी सपोर्ट देणे बंद करणार असल्याची घोषणा कंपनीने केली होती. १० जानेवारी २०२३ पासून WebView2 टूलसाठी सपोर्ट मिळणार नाही.

Google Chrome
Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा 'पंच', तब्बल 500KM च्या रेंजसह येणार 'या' भन्नाट इलेक्ट्रिक कार

गुगलने माहिती दिलीये की, विंडोज ७ आणि विंडोज ८/८.१ साठी क्रोम सपोर्ट देणे बंद करणार आहे. क्रोम १०९ हे शेवटचे व्हर्जन अपडेट असेल. तसेच, ७ फेब्रुवारी २०२३ ला क्रोम ११० अपडेट जारी केले जाईल. पुढील अपडेट हे केवळ विंडोज १० वर काम करणाऱ्या डिव्हाइसलाच मिळतील.

जे यूजर्स विंडोज ७ आणि विंडोज ८/८.१ चा वापर करत आहे, त्यांना नवीन अपडेटचा फायदा मिळणार नाही. नवीन अपडेट न मिळाल्यास सिक्योरिटी फीचर्सचा देखील फायदा मिळणार नाही. सिक्योरिटीच्या दृष्टीने लॅपटॉपमध्ये विंडोजचे लेटेस्ट व्हर्जन असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: iPhone Offer: iPhone खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! ३३ हजार रुपये स्वस्तात मिळतेय लेटेस्ट मॉडेल

तुम्ही जर विंडोज १० चा वापर करत असाल, तर सहज विंडोज ११ अपडेट करू शकता. विंडोज ११ कसे अपडेट करू शकता, याविषयी जाणून घ्या.

  • यासाठी सर्वात प्रथम लॅपटॉप अथवा डेस्कटॉपच्या विंडोज अपडेट सेटिंग्समध्ये जा.

  • त्यानेत अपडेट अँड सिक्योरिटी पर्यायावर क्लिक करा. आता विंडोज अपडेट पर्यायावर क्लिक करा.

  • आता Check for Updates वर जा.

  • येथे Window 11 पर्यायावर क्लिक करा.

  • पुढे डाउनलोड पर्यायावर क्लिक करून Window 11 ला इंस्टॉल करा.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com