Google Dreambeans App: गुगलने लाँच केले 'ड्रीम्बीन्स'ॲप! Gmail अन् Photo वापरून स्वतःच तयार करणार युनिक AI स्टोरीज...   

Google Dreambeans AI App: मजकुरासह सुंदर व्हिज्युअल स्टोरीज तयार करणार 'ड्रीम्बीन्स' ॲप; प्रॉम्प्ट देण्याची गरज नाही!
Google Dreambeans App Launched in India AI Visual Stories

Google Dreambeans App Launched in India: AI Visual Stories

esakal 

Updated on: 

Dreambeans App: टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने (Google) भारतीय युजर्ससाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि एक्सपेरिमेंटल एआय (AI) ॲप लाँच केले आहे. 'ड्रीम्बीन्स' (Dreambeans) असे नाव असलेल्या या नव्या ॲपची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, हे ॲप १८ वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगलच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे युजर्सना आता सोशल मीडिया फीड स्क्रोल करण्याची किंवा वारंवार प्रॉम्प्ट देण्याची गरज पडणार नाही, तर हे ॲप स्वतः युजर्सच्या आवडीनिवडीनुसार रोज नवीन आणि वैयक्तिकृत (Personalized) कथा तयार करेल.

Loading content, please wait...