esakal | खुशखबर! Google Duo वरुन कॉलिंग होणार सोपे; UI मध्ये दिसणार 'न्यू कॉल' बटण
sakal

बोलून बातमी शोधा

 Google Duo

Google आपल्या कॉलिंग सर्व्हिस प्लॅटफॉर्म Google Duo च्या यूजर इंटरफेसची (UI) पुन्हा डिजाइन करणार असल्याचे समजते.

खुशखबर! Google Duo वरुन कॉलिंग होणार सोपे

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Google आपल्या कॉलिंग सर्व्हिस प्लॅटफॉर्म Google Duo च्या यूजर इंटरफेसची (UI) पुन्हा डिजाइन करणार असल्याचे समजते. ज्यात यूजर्संना 'न्यू कॉल' बटणासह पुन्हा डिझाइन केलेले होम स्क्रीन देखील उपलब्ध होईल. याबाबत कंपनीचे असे मत आहे, की या नव्या प्रणालीमुळे वापरकर्त्यांना कॉल करणं सोपं होणार आहे. सर्च जायंटने Google Duo हेल्प वेबपेजवर पोस्टद्वारे या नवीन वैशिष्ट्याची नुकतीच घोषणा केलीय. दरम्यान, 'नवीन कॉल' बटण आपल्याला Google Duo वरुन कॉल करण्यास, तसेच एक ग्रुप तयार करण्यास अनुमती देईल, असेही स्पष्ट केलेय. (google-duo-redesigned-ui-to-receive-a-new-home-screen-with-a-new-call-button)

नवीन कॉल बटण कसे कार्य करेल?

या बटणाव्दारे यूजर्स कोणताही ग्रुप आणि आपल्या काॅन्टॅक्ट नंबरची यादी सहजपणे तपासू शकेल. तसेच हे बटण यूजर्संना "होम" डिव्हाइसवर कॉलही करु देईल. नवीन होम स्क्रीन युजर इंटरफेसमध्ये (यूआय) अद्याप स्क्रीनच्या शीर्षस्थानी सर्च बारच असेल, ज्यामध्ये 'नवीन कॉल' बटणासह ते पेज नवीन स्वरूपात दिसेल. हे नवीन बटण निळ्या रंगात फ्लोटिंग अॅक्शन बटणावर (FAB) आपल्याला पहायला मिळेल.

नव्या UI मुळे काय बदल होणार?

कंपनीचे म्हणणे आहे, की री-डिझाइन केलेल्या UI मध्ये पूर्वी होम स्क्रीनवर उपलब्ध असणारी काही फंक्शन्स समाविष्ट नाहीत. मात्र, आता वापरकर्ते काॅन्टॅक्ट किंवा ग्रुपवर टॅप करून व्हिडिओ संदेश, ऑडिओ संदेश, नोट अथवा इमेज तयार करुन पाठवू शकतील. त्याचबरोबर आपण अधिक वापरकर्त्यांना संदेश पाठवू इच्छित असल्यास, आपण प्रथम एक ग्रुप तयार करा अथवा आधीपासून तयार केलेला ग्रुप निवडा आणि 'न्यू कॉल' बटणावर टॅप करून, नंतर 'ग्रुप' या दुव्यावर क्लिक करून नवा ग्रुप तयार करु शकता. एखाद्या मित्राला 'न्यू कॉल'वर टॅप करुन आणि सर्च बारवर किंवा संपर्क सूचीव्दारे Google Duo वर देखील आमंत्रित करू शकता. जर हे दोन्ही उपलब्ध नसतील, तर आपल्याला त्यांच्या नावाच्या बाजूला असणाऱ्या निळ्या बटणावर क्लिक करावे लागेल. दरम्यान, कंपनीचा असा दावा आहे, की येत्या काही आठवड्यात पुन्हा डिझाइन केलेले यूआय Google Duo यूजर्संना अपडेट करुन दिले जाईल.

google-duo-redesigned-ui-to-receive-a-new-home-screen-with-a-new-call-button

loading image