esakal | आता टीव्हीवरूनसुद्धा करता येईल व्हिडिओ कॉलिंग ; गुगलने अँड्रॉइड टीव्हीवर केले ड्युओ लाँच
sakal

बोलून बातमी शोधा

video calling from Android TV

आपण आता आपल्या स्मार्ट टीव्हीवरूनसुद्धा व्हिडिओ कॉलिंग करू शकता. सर्च इंजिन कंपनी गुगलने आपले ड्युओ अॅप अँड्रॉइड टीव्हीवर लाँच केले आहे.

आता टीव्हीवरूनसुद्धा करता येईल व्हिडिओ कॉलिंग ; गुगलने अँड्रॉइड टीव्हीवर केले ड्युओ लाँच

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : सध्या अनेकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत. यामुळे अनेक नवनव्या गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. आपली माणसं आपल्यापासून कितीही दूर असली तरी आपण लगेच  स्मार्टफोनवरून कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून मनसोक्त गप्पागोष्टी करत असतो. त्यातच आपण आता आपल्या स्मार्ट टीव्हीवरूनसुद्धा व्हिडिओ कॉलिंग करू शकता. सर्च इंजिन कंपनी गुगलने आपले ड्युओ अॅप अँड्रॉइड टीव्हीवर लाँच केले आहे. अ‍ॅपच्या आगमनाचा हवाला देत सर्च इंजिन या कंपनीने सांगितले की, ते अँड्रॉइड टीव्हीकरिता हे बीटामध्ये उपलब्ध असणार आहे. 9To5Google एका अहवालानुसार, कोणतीही व्यक्ती फोन किंवा पीसी ब्राउझरद्वारे गूगल प्ले स्टोरवरून हा बीटा वर्जन डाउनलोड करू शकतो. 

ड्युओला होम स्क्रीनवर किंवा अ‍ॅप ट्रे वर कनेक्ट केले जाऊ शकत नाही. ते उघडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सेटिंग्ज अ‍ॅप किंवा साइडलँड लाँचरचा वापर करावा लागणार आहे. केवळ व्हॉईस कॉलसाठी, जो सध्या रिमोट कंट्रोलमध्ये आहे,तो एक मायक्रोफोनचा वापर करतो. परंतु वापरकर्त्यांना अद्याप एंड्रॉइड टीव्हीमध्ये गुगल ड्युओवर कॉल प्राप्त होऊ शकणार नाही. कदाचित गुगल येत्या काही काळात अ‍ॅपचे अपडेटेड वर्जनमध्ये या सुविधा देतील.  

गुगल ड्युओच्या मदतीने अँड्रॉइड टीव्हीद्वारे ग्रुप किंवा एक-एक असे करून तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येईल. आपल्या टीव्हीमध्ये जर कॅमेरा नसेल तर आपण टीव्हीवरून व्हिडिओ कॉलिंगसाठी यूएसबी कॅमेरा वापरू शकता. त्याचबरोबर, गुगल लवकरच गूगल ड्युओची जागा गुगल मीटला रिप्लेस करणार आहे. असे म्हणतात की या विलीनीकरणानंतर नवीन अॅपचे नाव 'ड्युएट' ‘Duet' (Duo + Meet) असणार आहे. गूगलने काही दिवसांपूर्वी गूगल ड्युओच्या वेब व्हर्जनवर एकाच वेळी 32 लोकांना व्हिडिओ कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्याची सुविधा दिली आहे. कंपनीने गुगल ड्युओमध्ये फॅमिली मोडची  ओळख करून दिली आहे.