Google ठेवतंय आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष; जाणून घ्या कसा कराल बचाव

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 21 February 2021

सध्या आपण गुगलचा उपयोग बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी करत असतो. इथं जगातील कोणत्याही गोष्टीबद्दल शोधलं असता ते आपल्याला तिथं भेटून जातं. पण हेच गुगल आपल्या स्मार्टफोनवर नजर ठेऊन असतं

औरंगाबाद: सध्या आपण गुगलचा उपयोग बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी करत असतो. इथं जगातील कोणत्याही गोष्टीबद्दल शोधलं असता ते आपल्याला तिथं भेटून जातं. पण हेच गुगल आपल्या स्मार्टफोनवर नजर ठेऊन असतं. आपण कुठं जातो, काय खातोय अशा बऱ्याचशा गोष्टींचा गुगलजवळ डाटा असतो. याचा उपयोग गुगल आपल्याला चांगल्या सुविधा तसेच पर्याय देण्यासाठी करत असते. जर तुम्हाला वाटत असेल की गुगलला आपली माहिती मिळाली न पाहिजे तर पुढील कृती करा-

लोकेशन ट्रॅक कसं बंद करायचं-

लोकेशन ट्रॅकिंग बंद करण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या प्रकारच्या पर्यायात, आपल्या डिव्हाइसवरील सर्व अ‍ॅप्सच्या लोकेशन डेटाची परमिशन ब्लॉक करता येईल.

-युजर्सना अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंग्जवर जावे लागेल.

-यानंतर, आपल्याला लोकेशन डेटावर क्लिक करावे लागेल.

-नंतर लोकेशन परमिशनला डावीकडे स्वाइप करून लोकेशन बंद केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, लोकेशन परमिशन देखील सुरु केली जाऊ शकते.

परमिशन ब्लॉक करण्याचा दुसरा पर्याय-

गुगल अकाउंटच्या लोकेशन हिस्ट्री फिचरला बंद करुन लोकेशन ट्रॅकिंगला बंद केलं जाऊ शकतं. यात सगळ्या गुगल अ‍ॅप्स आणि एक स्वाईप करुन बंद केलं जाऊ शकतं.

- गुगल अकाउंटच्या सेटींग ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

- यानंतर Manage your Google Account वर क्लिक करावं लागेल

- नंतर Google अकाउंटच्या Privacy & Personalization वर क्लिक करा

-ऍक्टीव्हिटी कंट्रोल सेक्शनच्या Location History वर क्लिक करावं लागेल.

-यानंतर डावीकडे स्वाइप करून लोकेशन हिस्ट्रीला बंद केलं जाऊ शकेल.

फक्त एका ऍपचंही लोकेशन बंद करु शकता-

आपण कोणत्यातरी एका ऍपची लोकेशन परमिशनही बंद करू शकतो. यासाठी पहिल्यांदा फोनच्या सेटिंगवर क्लिक करा. त्यानंतर लोकेशनवर क्लिक करा. यानंतर, ज्या अ‍ॅपला लोकेशन प्रवेशासाठी परवानगी देऊ इच्छित आहात ते अ‍ॅप त्यास स्वाइप करून ब्लॉक करू शकता किंवा परमिशन देऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google keeps eye on our every activities