esakal | गुगलची Pixel 6, Pixel 6 Pro सिरीज लवकरच बाजारात| Google launch pixel 6 series phones
sakal

बोलून बातमी शोधा

गुगल पिक्सेल सिरिज 19 ऑक्टोबरला लॉंच होणार आहे

गुगलची Pixel 6, Pixel 6 Pro सिरीज लवकरच बाजारात

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

गुगलने Google Pixel 6 और Pixel 6 Pro ही Pixel सिरीज बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. हे मॉडेल्स 19 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता लॉल्ज होणार आहेत. गुगनले आपल्या ट्विटर अकाऊंटवर गुगल Pixel सिरिज अधिकृत घोषणा केली.

या मिळतील सुविधा

एंड्रोइड 12 वर आधारित असलेला हा स्मार्टफोन आहे. पिक्सेल सिरिजचा डिस्प्ले 120 hz असून त्यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, सेंट्रल पंच होल डिस्प्लेची सुविधाही देण्यात येणार आहे. Google Pixel 6 Pro मध्ये ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअप असेल तर Pixel 6 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला फास्ट चार्ज करण्याची सोयही दिली आहे. नव्या Pixel स्टॅंड वायरलेस चार्जर सपोर्टचाही फोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही फोन्समध्ये 50mp आणि12mpचा कॅमेरा असणार आहे. दोन्ही फोनचा डिस्प्ले कर्व्ह असतील. तर, गुगलच्या दाव्यानुसार हा फास्ट, स्मार्टफोन असणार आहे. यात Tensor चा ऑक्टा कोअर प्रोसेसर असेल. तसेच यात वायफाय 6E चा सपोर्टही दिला जाणार आहे.

अपेक्षित किंमत

Pixel 6 स्मार्टफोन ची किंमत 61,999 तर, Pixel 6 Pro ची किंमत 79,990 असल्याचे अपेक्षित आहे.

19 ऑक्टोबरला फोन बुक करण्यासाठी येथे क्लिक करा. https://t.co/zmp5byVq1y#Pixel6Launch

loading image
go to top