Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Google Core Team : गुगलच्या कोअर टीममध्ये ते सदस्य असतात जे कंपनीच्या फ्लॅगशिप प्रॉडक्टवर काम करतात. यासोबतच यूजर सेफ्टी आणि ग्लोबल आयटी इन्फ्रास्ट्रक्चर बाबत याच टीमकडे जबाबदारी असते.
Google Layoffs
Google LayoffseSakal

Google Core Team Layoff : जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून कर्मचारी कपात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या कोअर टीममधील 'पायथॉन'ची संपूर्ण टीमच काढून टाकल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर आता आपल्या कोअर टीममधील सुमारे 200 जणांना गुगलने काढून टाकल्याचं समोर आलं आहे. यातील काही पोझिशन्सवर भारत आणि मेक्सिकोमध्ये संधी देण्यात येणार असल्याचंही यात म्हटलं आहे.

गुगलच्या कोअर टीममध्ये ते सदस्य असतात जे कंपनीच्या फ्लॅगशिप प्रॉडक्टवर काम करतात. यासोबतच यूजर सेफ्टी आणि ग्लोबल आयटी इन्फ्रास्ट्रक्चर बाबत याच टीमकडे जबाबदारी असते. सध्या सुंदर पिचाई याच टीमला बदलत आहेत असं दिसतंय. कॅलिफोर्नियाध्ये असणाऱ्या इंजिनिअरिंग टीममधील सुमारे 50 जणांना यापूर्वीच काढून टाकण्यात आलं आहे. CNBC ने याबाबतचंं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गुगल डेव्हलपर इकोसिस्टीमचे व्हीपी आसिम हुसैन यांनी एका ई-मेलच्या माध्यमातून लेऑफची माहिती दिली होती. आपल्या टीममधील हा सर्वात मोठा लेऑफ असल्याचंही त्यांनी एका टाऊन हॉल मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना म्हटलं होतं. "आम्ही सध्या आमची ग्लोबल फुटप्रिंट कायम ठेऊन, वर्क लोकेशन्स वाढवण्याचा विचार करत आहोत. यामुळे आम्ही आमच्या पार्टनर आणि डेव्हलपर कम्युनिटीजच्या आणखी जवळ जाऊ शकणार आहे." असं हुसैन यांच्या ई-मेलमध्ये म्हटलं होतं. या आणि इतर डॉक्युमेंट्सच्या आधारे असं म्हटलं जात आहे की कंपनी भारत आणि मेक्सिकोमध्ये काही जागांवर भरती करेल.

Google Layoffs
Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

इतर जागांवर कामची संधी

गुगलच्या एका प्रवक्त्याने 'न्यूयॉर्क पोस्ट'शी बोलताना सांगितलं, की लेऑफमध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ते कंपनीमध्येच इतर ओपन पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात. "कर्मचाऱ्यांना वेगळ्या प्रकारच्या कामाची संधी मिळावी यासाठी आम्ही आमचं वर्क स्ट्रक्चर अधिक सिंपल करत आहोत." असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com