
गुगलने आपला आयकॉनिक ‘G’ लोगो जवळपास एका दशकानंतर नव्या रूपात सादर केला आहे. हा बदल गुगलच्या डि ॲपच्या बीटा आवृत्ती 16.18 मध्ये आणि iOS वापरकर्त्यांसाठी गुगल सर्च ॲपद्वारे रोल आउट होत आहे. नव्या लोगोमध्ये पारंपरिक चार रंगांचे ठोस ब्लॉक्स - लाल, पिवळा, हिरवा आणि निळा - यांना ग्रेडियंट इफेक्टने बदलण्यात आले आहे. हा सूक्ष्म पण प्रभावी बदल गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रित रणनीतीचा भाग आहे, जो कंपनीच्या ब्रँड आयडेंटिटीला अधिक आधुनिक आणि डायनॅमिक बनवतो.