Google Maps Fuel Saving : आता पेट्रोल-डिझेलची बचत करणार 'गुगल मॅप्स'; खास फीचर झालं भारतात लाँच

Fuel Saving Feature : यापूर्वी हे फीचर केवळ अमेरिका, कॅनडा आणि युरोपात उपलब्ध होतं.
Google Maps Fuel Saving
Google Maps Fuel SavingeSakal

Google Maps Launches Fuel Saving Feature : एखाद्या ठिकाणी जाण्याचा रस्ता शोधण्यासाठी आपण सर्रास गुगल मॅप्सची मदत घेतो. गुगलच्या या अ‍ॅपवर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ, रस्त्यावर असणारं ट्रॅफिक आणि त्या ठिकाणी जाण्याचे दोन-तीन पर्याय अशा बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. यातच आता आणखी एक फीचर जोडण्यात आलं आहे.

गुगल मॅप्सच्या या नव्या फीचरमुळे इंधनावरील खर्च कमी होऊन पैशांची बचत होणार आहे. यापूर्वी हे फीचर केवळ अमेरिका, कॅनडा आणि युरोपात उपलब्ध होतं. आता भारतात देखील हे खास फीचर लाँच करण्यात आलं आहे.

कसं काम करतं हे फीचर?

मॅप्सचं नवीन फ्युअल सेव्हिंग फीचर सुरू केल्यानंतर गुगल विविध प्रकारच्या पद्धती वापरुन इंधन बचतीसाठी पर्याय शोधतं. यामध्ये रिअल टाईम ट्रॅफिक, रस्त्याची परिस्थिती अशा गोष्टी तपासल्या जातात. सोबतच, निश्चित ठिकाणी जाण्यासाठी एखादा शॉर्टकट किंवा क्विक रूट आहे का हेदेखील तपासलं जातं.

Google Maps Fuel Saving
WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅपवर महत्त्वाचे मेसेज हरवणार नाहीत; कंपनी आणतेय खास फीचर

हे फीचर डिसेबल असल्यावर देखील गुगल मॅप्स सगळ्यात वेगवान रस्त्याचा पर्याय देतं. मात्र, यामध्ये फ्युअल सेव्हिंगवर लक्ष दिलं जात नाही.

असं करा सुरू

  • हे फीचर सुरू करण्यासाठी गुगल मॅप्स ओपन करा.

  • यानंतर वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या प्रोफाईलवर क्लिक करा.

  • यानंतर सेटिंग्स हा पर्याय निवडा.

  • यानंतर 'नॅव्हिगेशन सेटिंग्स' यावर टॅप करा.

  • यानंतर स्क्रोल डाऊन करुन 'रूट ऑप्शन्स' हा पर्याय निवडा.

  • यानंतर 'प्रेफर फ्युएल एफिशियंट रूट्स' या पर्यायावर टॅप करा.

  • यानंतर तुमचं इंजिन टाईप निवडा.

Google Maps Fuel Saving
CNG Bike : पेट्रोलची चिंता सोडा! आता सीएनजीवर चालणारी बाईक येणार; 'बजाज'ने दिले संकेत

यानंतर तुम्हाला गुगल इंधनाची बचत करण्यासाठी योग्य रस्त्याचा पर्याय दाखवेल. हे फीचर भारतात रोलआउट करण्यात आलं असून, टप्प्या-टप्प्याने ते सर्व स्मार्टफोनमध्ये दिसेल. यासाठी तुम्हाला गुगल मॅप्स हे अ‍ॅप अपडेट करावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com