esakal | आता Google Maps दाखवणार ईको-फ्रैंडली रस्ते, लवकरच नवे फिचर
sakal

बोलून बातमी शोधा

google maps will show eco friendly routes service will start soon Marathi article

गुगल मॅप्स आता आपल्याला सांगेल की कोणत्या रस्त्यावर सर्वात कमी प्रदूषण आहे किंवा कोणता मार्ग ईको-फ्रैंडली आहे. जेथे कमीतकमी प्रदूषण असेल त्या रस्त्यांबद्दल Google Maps आपल्याला माहिती देईल. आज आपण या विषयी जाणून घेणार आहेत

आता Google Maps दाखवणार ईको-फ्रैंडली रस्ते, लवकरच नवे फिचर

sakal_logo
By
टीम ईसकाळ

Gooogle Maps ने आपल्याला प्रवास करताना येणाऱ्या समस्या बर्‍याच प्रमाणात कमी केल्या आहेत.  आधी ज्या ठिकाणी प्रवासादरम्यान अडचणी येत होत्या, आता त्या रस्त्यांवर Google Maps वापरुन सहज प्रवास केला जाऊ शकतो. तसेच आता Google चे एक विशेष अॅप आणखी एक नवीन सेवा घेऊन येत आहे. गुगल मॅप्स आता आपल्याला सांगेल की कोणत्या रस्त्यावर सर्वात कमी प्रदूषण आहे किंवा कोणता मार्ग ईको-फ्रैंडली आहे. जेथे कमीतकमी प्रदूषण असेल त्या रस्त्यांबद्दल Google Maps आपल्याला माहिती देईल. आज आपण या विषयी जाणून घेणार आहेत

इको-फ्रेंडली रस्ते

Google ने या वर्षापासून अमेरिकेत ही नवीन पर्यावरण-अनुकूल मार्ग सेवा सुरू केली होती. त्याचबरोबर आता जगभरातील बर्‍याच देशांमध्ये ही सेवा सुरू केली जात आहे. ही सेवा सुरु करताना गुगलने म्हटले आहे की आम्ही याद्वारे हवामान बदल कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेव्हा जेव्हा नकाशामध्ये मार्ग शोधला जाईल तेव्हा प्रथम पर्यावरणास अनुकूल मार्ग डीफॉल्ट येईल. जर हा खूपच दूरचा रस्ता असेल का तर यावर गुगलेने सांगीतले की या पर्यावरणपुरक रस्त्याने जाण्यासाठी देखील तेवढाच वेळ लागेल. पण जर तुम्हाला इको फ्रेंडली रुट नको असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय देखील  उपलब्ध असेल. 

असे असतील फायदे 

Google Product चे डायरेक्टर  रसेल डिकर यांनी सांगीतले की, आम्हाला जगभरातील आर्ध्या इको-फ्रेंडली रस्त्यांबद्दल माहिती मिळाली आहे. मात्र  आम्ही अद्यापही आणखी रस्ते शोधत आहोक आम्ही कमी वेळेत आणि कमी  कार्बन उत्सर्जनासह लोकांना प्रवास पुर्ण करता यावा यासाठी नवे पर्याय शोधत आहोत. यामुळे लोकांचा वेळ आणि इंधनाची बचत तर होईलत, तसेच त्यासोबत सुंदर पर्यावरणाचा आणि  हिरवळीचा आनंद देखील त्यांना घेता येईल. 

गुगलने रस्ते केले अपडेट

रसेल यांनी सांगीतले की, त्यांनी अमेरिका सरकारच्या नॅशनव रिन्यूएबल एनर्जी लॅबचे सर्व मानके पुर्ण केली आहेत. यात आम्हीरोड ग्रेड डेटा, स्ट्रिट व्ह्यू, एरियल आणि सॅटेलाईट एमेजरी यांचा वापर केला आहे. तसेच लोकांना इको-फ्रेंडली रस्ते वापरता यावेत यासाठी सगळे रस्ते अपडेट करण्यात आले आहेत. 
 

loading image
go to top