QR Scanner : आता दूर असलेला क्यूआर कोडही जागेवरुनच करता येणार स्कॅन; गुगल आणतंय नवीन फीचर

यासाठी गुगल मशीन लर्निंगची मदत घेणार आहे.
QR Scanner Google
QR Scanner GoogleeSakal

डिजिटल इंडिया मोहिमेमुळे आजकाल सगळीकडे ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध झाली आहे. यूपीआय पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅन करायचा असेल, तर तुम्हाला त्या कोडच्या जवळ जावं लागतं. मात्र, आता असं करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही.

क्यूआर कोड सुविधा अधिक चांगली होण्यासाठी गुगल यामध्ये नवीन फीचर आणत आहे. यानंतर समोर दूरवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी तुम्हाला पुढे जाण्याची, किंवा झूम करण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुम्ही जिथे आहात तिथूनच दूर असलेला QR कोड स्कॅन करता येणार आहे.

QR Scanner Google
Google Search Update : गुगलने सर्च ऑप्शनला दिले तीन नवे अपडेट्स! यूजर्सना होणार मोठा फायदा

कसं असेल फीचर?

गुगल सध्या मशीन लर्निंगचा वापर करून कॅमेरा फ्रेममध्ये क्यूआर कोड डिटेक्ट करणे, झूम करणे आणि ऑटोमॅटिकली तो स्कॅन करणे यासाठी नव्या फीचरवर काम करत आहे. सध्या हा अपडेट काही डेव्हलपर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अँड्रॉईड तज्ज्ञ मिशाल रहमान यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

एक्स या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हे फीचर कसं काम करेल हे दाखवलं आहे. सोबतच कॅप्शनमध्ये त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. अँड्रॉईड फोनमध्ये असलेले क्यूआर कोड स्कॅनर अपग्रेड करण्याची तयारी गुगल करत असल्याचे संकेत रहमान यांनी पूर्वीच दिले होते.

QR Scanner Google
Google Account : ..तर तुमचं गुगल अकाउंट होईल कायमचं बंद! कंपनीचा यूजर्सना गंभीर इशारा

लवकरच मिळणार फीचर

हे फीचर लाँचसाठी तयार झाल्यानंतर कदाचित सुरुवातीला गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये ते आधी देण्यात येईल. त्यानंतर कदाचित ते इतर अँड्रॉईड फोनसाठी उपलब्ध होईल. याबाबत अधिक माहिती सध्या देण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com