Kamala Sohonie : Ph.D मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला वैज्ञानिकांची आज जयंती, गुगलची डूडलमार्फत आदरांजली

बहुतांश लोकांच्या आवडीचे पेय असलेल्या 'नीरा'चा शोध त्यांनीच लावला होता.
Kamala Sohonie Google Doodle
Kamala Sohonie Google DoodleeSakal

भारतीय वैज्ञानिक कमला सोहोनी यांची आज ११२वी जयंती आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल (Google Doodle today) बनवत त्यांना आदरांजली वाहिली आहे. विज्ञान विषयात पीएचडी मिळवणाऱ्या कमला या पहिल्या भारतीय महिला होत्या. यासोबतच त्यांना भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक म्हणूनही ओळखलं जातं.

एवढंच नाही, तर प्रतिष्ठित अशा भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू (IISc) येथे प्रवेश मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्याच महिला होत्या. सोहोनी (Kamala Sohonie) या बायोकेमिस्ट होत्या. विज्ञान विषयात त्यांचं योगदान अनन्यसाधारण होतं. तर, दुसरीकडे या विषयातील पुरूषांची मक्तेदारी मोडत काढून महिलांसाठी दरवाजे खुले करण्याचं श्रेयही कमला यांना जातं.

Kamala Sohonie Google Doodle
First Woman in Space : आजच्या दिवशी घडला होता इतिहास! अंतराळात प्रथमच गेली महिला; जाणून घ्या सविस्तर

सोहोनी यांचा जन्म १९११ साली मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांचा अभ्यास केला होता. १९३३ मध्ये त्यांनी आपल्या वर्गात टॉप करत बॅचलर डिग्री मिळवली. यानंतर त्यांनी सातत्याने प्रयत्न करून भारतीय विज्ञान संस्थेत प्रवेश मिळवला.

याठिकाणी प्रवेश मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या. यानंतर पीएचडी मिळवत, देशातील पहिल्या महिला डॉक्टरेट होण्याचा मानही त्यांनी मिळवला. पुढे जाऊन मुंबईतील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या पहिल्या महिला संचालक ठरल्या.

Kamala Sohonie Google Doodle
Sambhaji Nagar : 'लालपरी'त महिला क्रांती, एसटीच्या इतिहासात प्रथमच महिलेने सिल्लोड मार्गावर चालवली बस

लावला मोठा शोध

सोहोनी यांना केंब्रिज विद्यापीठाची रिसर्च स्कॉलरशिप मिळाली होती. याठिकाणी अभ्यास करताना त्यांनी सायटोक्रोम-सी चा शोध लावला होता. वनस्पतीच्या कोशिकांमध्ये उर्जा उत्पादन करण्यासाठीचं हे महत्त्वपूर्ण एन्झाईम मानलं जातं. अवघ्या १४ महिन्यांमध्ये त्यांनी हा रिसर्च करुन आपला पीएचडी थिसिस पूर्ण केला होता.

'नीरा'साठी मिळाला राष्ट्रपती पुरस्कार

आज बहुतांश लोकांच्या आवडीचे पेय असलेल्या 'नीरा'चा शोध त्यांनीच लावला होता. ताडगोळ्यांपासून बनलेल्या या पेयामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. या पेयाचा फायदा कुपोषित मुलं आणि गर्भवती महिलांच्या पोषणासाठी होतो. या शोधासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

Kamala Sohonie Google Doodle
Sania Mirza: सानिया मिर्झा बनणार देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com