सरकारचा अलर्ट! Google Play Store वरून पटकन डिलिट करून टाका हे डेंजर अ‍ॅप; नाहीतर हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल

Google play store insecure danger apps : गुगल प्ले स्टोअरवरील काही अ‍ॅप्स बनावट असून, क्रिप्टो वॉलेटमधील माहिती चोरी करत आहेत.
Google play store insecure danger apps
Google play store insecure danger appsesakal
Updated on

तुमच्या स्मार्टफोनमध्ये "क्रिप्टो वॉलेट" संबंधित अ‍ॅप आहेत का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षेच्या तज्ज्ञांनी Google Play Store वरच्या काही खोट्या आणि फसवणूक करणाऱ्या अ‍ॅपबाबत गंभीर इशारा दिला आहे. ही अ‍ॅप्स बेकायदेशीर पद्धतीने वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आणि क्रिप्टो करंसी चोरण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.

या अ‍ॅप्सनी नामांकित आणि विश्वासार्ह अ‍ॅप्सची नक्कल करत स्वतःला सुरक्षित वाटावे असे रूप दिले आहे. एकदा का वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप्स डाउनलोड केले की त्यांना बनावट वेबसाईट्सकडे किंवा खोट्या स्क्रीनकडे वळवले जाते. या स्क्रीनवर वापरकर्त्यांकडून "Mnemonic Phrase" (क्रिप्टो वॉलेट रिकव्हरी कोड) विचारला जातो आणि एकदा का तो मिळाला, की तुमचं पूर्ण वॉलेट त्याच्या ताब्यात जातं.

सायबल रिसर्च आणि इंटेलिजन्स लॅब्स (CRIL) च्या अहवालानुसार, २० पेक्षा जास्त धोकादायक अ‍ॅप्स Google Play Store वर आढळले आहेत.

Google play store insecure danger apps
Budget Mobile Launch : चीनला धोबीपछाड! भारतातील बड्या कंपनीने 7999 रुपयांत लाँच केला 5G स्मार्टफोन; दमदार फीचर्स एकदा बघाच

हे अ‍ॅप्स लगेच डिलिट करा-

  • Pancake Swap

  • Suiet Wallet

  • Hyperliquid

  • Raydium

  • BullX Crypto

  • OpenOcean Exchange

  • Meteora Exchange

  • SushiSwap

  • BullX Crypto

  • Harvest Finance blog

Google play store insecure danger apps
लाँच झाला Vivo T4 Ultra मोबाईल! काही मिनिटांत होणार चार्जिंग; परवडणारी किंमत अन् दमदार AI फीचर्स, पाहा एका क्लिकवर

स्वतःचं संरक्षण कसं कराल?

  1. हे सर्व अ‍ॅप्स त्वरित हटवा.

  2. Mnemonic Phrase किंवा वॉलेट रिकव्हरी कोड केवळ अधिकृत अ‍ॅपमध्येच टाका.

  3. अ‍ॅप्स फक्त अधिकृत वेबसाइटवरून किंवा विश्वासार्ह सोर्समधूनच डाउनलोड करा.

  4. 2FA (Two-Factor Authentication) सक्रीय ठेवा.

  5. आपले वॉलेट व्यवहार नियमितपणे तपासत रहा.

या प्रकारातील सायबर फसवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. Google Play Store वर जरी अ‍ॅप उपलब्ध असेल, तरी ते सुरक्षित आहे याची खात्री करणे तुमची जबाबदारी आहे. विशेषतः क्रिप्टो वॉलेटसारख्या संवेदनशील अ‍ॅप्ससाठी सतर्कता आणि माहितीची पडताळणी अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com