Google Fined : गुगलला 70 कोटी डॉलर्सचा दंड! आपल्या यूजर्सना वाटावे लागणार 63 कोटी डॉलर्स

Google Lost Case : गुगल कंपनीवर आपल्या यूजर्सकडून अधिक पैसे वसूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Google Fined Again
Google Fined AgaineSakal

Google to distribute 63 crore dollars :

जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी गुगलला एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने गुगलला 70 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. यातील 63 कोटी डॉलर्स हे 10 कोटी यूजर्सना वाटले जातील. तर, बाकी 7 कोटी डॉलर्स हे एका फंडमध्ये जमा केले जाणार आहेत.

काय आहे कारण?

गुगल इंक (Google Inc.) कंपनीवर आपल्या यूजर्सकडून अधिक पैसे वसूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासोबतच प्ले स्टोअरवर (Google Play Store) पर्चेसिंग पर्याय देऊन मोनोपॉली प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गुगलने केला असाही आरोप कंपनीवर करण्यात आला होता.

कंपनीने आपल्या अँड्रॉईड प्ले-स्टोअरवर इन-अ‍ॅप पर्चेस (In-App Purchase) आणि अन्य निर्बंध लागू केले होते. या माध्यमातून गुगल अधिक पैसे वसूल करत होती असे आरोप करण्यात आले होते. अर्थात, गुगलने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Google Fined Again
Google Maps Tracking : आता सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन; गुगल मॅप्स आणतंय नवी पॉलिसी

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने गुगलच्या विरोधात निर्णय दिला आहे. यामुळे सेटलमेंटसाठी दंड भरण्याची गुगलने तयारी दर्शवली आहे. सोबतच प्ले-स्टोअरवर प्रतिस्पर्धींसाठी जागा उपलब्ध करून देण्यासही गुगलने होकार दिला आहे.

कुणाला मिळणार पैसे?

अमेरिकेतील 50 राज्ये, डीसी, पोर्टो रिको आणि यूएस व्हर्जिन आयलँड याठिकाणी राहणाऱ्या सुमारे 10 कोटी नागरिकांना गुगल पैसे देणार आहे. 16 ऑगस्ट 2016 ते 30 सप्टेंबर 2023 या दरम्यान ज्या यूजर्सनी प्ले स्टोअरवरुन एखादं अ‍ॅप खरेदी केलं होतं, किंवा इन-अ‍ॅप पर्चेस केलं होतं त्या सर्वांना गुगल पैसे देणार आहे.

Google Fined Again
Google New feature : गुगल आणत आहे अप्रतिम फीचर, आता तुम्ही हाईड करू शकणार तुमचे सिक्रेट फोटो आणि व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com