Google Tool : गुगलचं नवं टूल, आता काढू शकता सर्चमधून वैयक्तिक माहिती

हे फिचर फक्त अँड्रॉइडवर गुगल ॲप वापरणाऱ्या काही लोकांसाठीच
google tool
google toolesakal

वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर जगभरातून टीकेला सामोर जावं लागल्यानंतर, गुगलने सर्च मधून वैयक्तिक माहिती काढून टाकण्यासाठी एक नवीन टूल बनवल आहे. 'रिझल्ट्स अबाऊट यू' नावाच्या या टूलद्वारे वापरकर्ते मोबाइल नंबर, ईमेल आणि घराच्या पत्त्यासह वैयक्तिक माहिती (PII) काढून टाकण्यासाठी गुगलला थेट विनंती करू शकतील. मात्र, सुरुवातीला हे फिचर फक्त अँड्रॉइडवर गुगल ॲप वापरणाऱ्या लोकांसाठीच असेल.

google tool
Navratri 2022 : तनिष्कचे हे ५ दागिने तुम्हाला बनवतील सुंदर आणि आकर्षक

गुगलने आपल्या वार्षिक विकासक परिषदेदरम्यान या गोपनीयतेच्या टूलची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइल पेजद्वारे 'रिझल्ट्स अबाऊट यू' पर्यायावर जाऊ शकतात. तेथून ते गुगलला PII काढण्याची विनंती करणार्‍या दुसर्‍या पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जातील. या दरम्यान, प्रत्येक निकालाच्या वरच्या-उजव्या कोपऱ्यात दिसणार्‍या तीन बिंदूंवर क्लिक करून माहिती काढली जाऊ शकते.

सध्या, कोणताही PII काढण्यासाठी वापरकर्त्यांना वरील पद्धत वापरावी लागेल .'रिझल्ट्स अबाउट यू' मध्ये 'ऑल रिक्वेस्ट', 'इन प्रोग्रेस' आणि 'अप्रूव्ड सारखे विनंतीशी संबंधित फिल्टर्स देखील असतील. गुगलने यापूर्वी सांगितले होते की जेव्हा कंपनीला PII काढून टाकण्याची विनंती प्राप्त होईल, तेव्हा ती त्याची दखल घेईल . या वर्षाच्या सुरुवातीला, गुगलने वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती काढून टाकण्यासाठी त्यांची धोरणे अपडेट केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com