

GoogleBook AI Laptop Launched: 2.8K OLED, 14hr Battery & Gemini AI
esakal
GoogleBook AI Laptop: जागतिक टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलने (Google) तंत्रज्ञान जगतात एक नवीन क्रांती घडवत आपला पहिला अत्याधुनिक AI फीचर्सयुक्त 'GoogleBook' लॅपटॉप लाँच केला आहे. हा लॅपटॉप अँड्रॉइड स्टॅक तंत्रज्ञान आणि क्रोम ओएस (ChromeOS) डेस्कटॉप एक्सपिरिअन्सच्या अद्वितीय संयोजनासह लॉंच करण्यात आला आहे. गूगलने या लॅपटॉपच्या हार्डवेअर निर्मितीसाठी एसर (Acer), असूस (Asus), डेल (Dell), एचपी (HP) आणि लेनोव्हो (Lenovo) या नामांकित कंपन्यांशी अधिकृत भागीदारी केली आहे.
उत्कृष्ट 2.8K OLED डिस्प्ले, 14 तासांचा दीर्घ बॅटरी बॅकअप आणि गुगलच्या स्वदेशी जेमिनी एआय (Gemini AI) टूल्सने सज्ज असलेला हा लॅपटॉप प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.