गुगलचा मिनी स्पीकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

सध्या विविध ईअरबड्‌स, स्पीकर्स, हेडफोन्सला तरुणाईकडून मोठी मागणी आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे हेडफोन्स, स्पीकर्स उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली : सध्या विविध ईअरबड्‌स, स्पीकर्स, हेडफोन्सला तरुणाईकडून मोठी मागणी आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे हेडफोन्स, स्पीकर्स उपलब्ध आहेत. त्यातच आता गुगलने नवा स्पीकर भारतात दाखल झाला आहे. प्रवासात, कारमध्ये, फिरायला गेल्यावर सोबतीला संगीताची मजा लुटता यावी, या उद्देशाने हा स्पीकर सादर केला आहे.

‘गुगल नेस्ट मिनी स्पीकर’ असे या स्पीकरचे नाव आहे. ऑक्‍टोबर महिन्यात गुगल पिक्‍सेल ४ स्मार्टफोन्सवेळी हा स्पीकर सादर करण्याचे सूतोवाच कंपनीने केले होते. त्यानंतर एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हा स्पीकर भारतात दाखल झाला आहे.
उठता-बसता सहज वापरता येईल, अशा प्रकारे या स्पीकरची रचना करण्यात आली आहे.

भिंतीवर, टेबलवर, गाडीत कुठेही सहजपणे ठेवता येणाऱ्या या स्पीकरची किंमत ४४९९ रुपये आहे. संगीताचा दर्जेदार अनुभव मिळण्यासाठी या स्पीकरमध्ये गुगलने अत्याधुनिक मशीन लर्निंग चीप बसवली आहे. या चीपमुळे मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपला स्पीकरला ब्ल्यूटूथ किंवा केबलने जोडल्यावर विनाव्यत्यय संगीत ऐकता येते. तसेच हा स्पीकर यू-ट्युब, स्पॉटिफाय, गाना, सावन, विंक म्युझिकशी सहजपणे जोडता येतो. विशेष म्हणजे या स्पीकरमध्ये गुगल असिस्टंटची देखील सुविधा देण्यात आली आहे.

web title : Google's mini speaker


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google's mini speaker