Artificial Intelligence : सरकारी संगणकावर एआय नकोच, केंद्र सरकारला चिंता डेटा सुरक्षेची; अर्थ मंत्रालयाकडून पत्रक जारी
Indian Government : केंद्र सरकारने सरकारी संगणकांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करण्यास मनाई केली आहे. अर्थ मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना संवेदनशील माहितीच्या गोपनीयतेच्या भंगापासून वाचवण्यासाठी हे आदेश जारी केले आहेत.
नवी दिल्ली : केंद्र सरकारशी संबंधित संवेदनशील माहिती उघड होऊन गोपनीयतेचा भंग होऊ शकतो त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करू नये असे आदेश अर्थ मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.