iPhone Hacking Alert : आयफोन वापरणाऱ्यांसाठी अलर्ट! कधीही हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल, सरकारने चिंता व्यक्त करत सांगितलं कारण

CERT In warns iphone ipad mac users security risks software update : सरकारच्या सायबर आपत्कालीन प्रतिसाद टीमने (CERT-In) Apple iPhone, iPad, Mac, आणि Safari ब्राउझर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
how to secure iphone ipad mac latest security update cyber security alert
CERT In warns iphone ipad mac users security risks software updateesakal
Updated on

Apple Device users security alert : सरकारच्या सायबर आपत्कालीन प्रतिसाद टीमने (CERT-In) Apple iPhone, iPad, Mac, आणि Safari ब्राउझर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. या डिव्हाइस आणि सॉफ्टवेअरमध्ये काही कमकुवतपणा आढळले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती सायबर हल्ल्यांमुळे धोक्यात येऊ शकते. यापासून बचाव करण्यासाठी त्वरित सुरक्षा अपडेट्स डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोणत्या डिव्हाइसना धोका?

CERT-In च्या अहवालानुसार, खालील डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर आवृत्त्या धोक्यात आहेत.

iPhone आणि iPad: iOS 18.1.1 किंवा iPad OS 18.1.1 च्या आधीच्या आवृत्त्या.

iOS 17.7.2 आणि iPad OS 17.7.2: या जुन्या आवृत्त्या देखील अपडेट करणे आवश्यक आहे.

Mac डिव्हाइस: macOS Sequoia 15.1.1 च्या आधीच्या आवृत्त्या असलेले डिव्हाइस.

Safari ब्राउझर: आवृत्ती 18.1.1 च्या आधीचे सर्व ब्राउझर.

Apple Vision डिव्हाइस: 2.1.1 च्या आधीच्या आवृत्त्या.

धोका कशामुळे आहे?

Apple डिव्हाइसच्या सॉफ्टवेअरमध्ये असे दोन मोठ्या वीकनेस आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्सना डिव्हाइसवर नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते आणि वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?

डिव्हाइस अपडेट करा: तुमच्या iPhone, iPad किंवा Mac वर सेटिंग्जमध्ये जाऊन 'Software Update' पर्याय निवडा आणि त्वरित नवीन आवृत्ती डाऊनलोड करा.

सतत अपडेट तपासा: तुमचे डिव्हाइस वेळोवेळी अपडेट करून ठेवा, ज्यामुळे भविष्यातील सायबर हल्ल्यांचा धोका कमी होईल.

Apple च्या आगामी अपडेट्सबाबत महत्त्वाची माहिती

Apple कंपनी पुढील महिन्यात iOS 18.2 अपडेट सादर करणार आहे. या नव्या अपडेटमध्ये iPhone वापरकर्त्यांसाठी डिझाईन आणि लेआउटमध्ये बदल, तसेच Siri मध्ये सुधारणा होणार आहेत. याआधी आलेल्या iOS 18.1 मध्ये ‘Apple Intelligence’ नावाचे फीचर सादर करण्यात आले होते, जे काही ठराविक iPhone मॉडेल्सपुरते मर्यादित आहे.

तुमच्या Apple डिव्हाइसच्या सुरक्षिततेसाठी त्वरित अपडेट करा आणि सायबर हल्ल्यांपासून तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com